वेळ निघून जात आहे

मागच्या उन्हाळ्यात मी माझ्या एका पुरुष मित्रासोबत एका लग्नाला गेले होते आणि माझ्या हातात मी फुलांचा गुच्छ घेतला होता. मी जेव्हा तो फुलांचा गुच्छ टेबलावर ठेवायला गेले तेव्हा त्यानं अनावश्यकपणे आणि असंवेदनशीलपणे म्हटलं की आम्ही जोडपं नाही. या गोष्टीमुळे मला पुन्हा एकदा या कटु सत्याची आठवण झाली की मी तिथं फकत एक रिकामी जागा भरण्यासाठी आणि नृत्यात एक साथीदार म्हणूनच उपस्थित होते, आणि मी या गोष्टीची आशा बाळगू नये की लवकरच मीदेखील माझा स्वत:चा लग्नाचा पांढरा गाऊन घालीन आणि माझंदेखील लवकरच लग्न होईल. आम्ही दोघं फक्त मित्र आहोत.

खरंतर, मला लग्न समारंभांना जायला खूप आवडतं. मी माझ्या जीवनातील अशा एका टप्प्यावर पोहचले आहे, की दरवर्षी मी अनेक लग्नसोहळ्यांमध्ये उपस्थित राहत आहे. लग्नासाठी तयार होणे आपल्या प्रियांसोबत लग्नांमध्ये उपस्थित राहणे आणि साजरा करणे खरोखर मजेशीर आहे, आणि वधूपक्षातर्फे लग्नात उपस्थित राहणे तर खरोखरच मोठया सन्मानाची गोष्ट आहे. पण, जसजसं माझं वय वाढत चाललं आहे, असं करणं माझ्यासाठी दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे.

मला वारंवार ही गोष्ट सांगण्यात येते की वाट पाहणं चांगलं आहे. पण, मी तर कितीतरी काळापासून फक्त वाटच पाहत आहे! मला वाटत राहतं की मी एकटीच कुठंतरी बाहेर अडकलेली आहे: जगाच्या बाहेर जिथं मला प्रोत्साहन दिलं जात आहे की मी अजूनही अविवाहित राहावं, आणि मी त्या विवाहित लोकांच्या जगाचा भाग बनू नये ज्याचा भाग माझ्या कितीतरी मैत्रिणी बनत आहेत. मला माहीत नाही मी या जगाचा भाग कधी बनेन, किंवा मला आमंत्रित केलं जाईलही की नाही. माझ्यासाठी तर अविवाहित राहणं म्हणजे माझ्या जीवनाचा सर्वात कठीण भाग बनला आहे.

माझे ब्लँकेट कोणी चोरणार नसले तरीही ती थंड दुहेरी पलंगावर रेंगाळते हे एक वेदनादायक वास्तव आहे.

माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका; अविवाहित राहण्याचे काही फायदेही आहेत. मला या गोष्टीचा आनंद होतो, की मल्रा जे पाहिजे, जेव्हा पाहिजे तेव्हा मी ते करू शकते. मला याचा आनंद वाटतो की जेव्हा मी चित्रपट पाहण्यासाठी इंटरनेटवर लॉगिन करते तेव्हा मला कोणाशीही तडजोड करण्याची गरज नाही. मी जर का कोणाची “झाले असते” आणि मला जर माझ्या पुरुष मित्रांसोबत वेळ घालवायला बाहेर जावं लागलं असतं, तर त्या वेळी माझ्या मनात जी दोषभावना निर्माण झाली असती ती दोषभावना आता निर्माण होत नाही.

मला माझ्या मैत्रिणींच्या बाळांना कवेत घ्यायला आवडते. पण, जेव्हा ते “मम्मी-मम्मी” म्हणून आपल्या आईला हाक मारतात आणि माझ्या कवेतून बाहेर पडतात तेव्हा माझ्या अविवाहितपणाची मला आठवण होते. माझे ब्लँकेट कोणी चोरणार नसले तरीही ती थंड दुहेरी पलंगावर रेंगाळते हे एक वेदनादायक वास्तव आहे. मला गंभीर नातेसंबंधातील वचनबद्धतेची आणि स्वतःच्या एका छोट्या कुटुंबाची ओढ आहे, पण मला भीतीही तितकीच वाटते.

मी ऑनलाईन डेटिंग साईटसदेखील वापरून पाहिले आहे, मी एक सामाजिक प्राणी आहे, आणि अनोळखी लोकांशी बोलायलाही मला आवडते. विद्यापीठात मी पाच वर्षे घालवली आहेत; तिथं माझ्या अनेक मैत्रिणी प्रेमात पडल्या आणि त्यांना त्यांचा जीवनसाथी मिळाला. मी अनेकदा डेटवरही गेलेली आहे, आणि मी कितीतरी पुरुषांना भेटलेली आहे; पण जीवनसाथी म्हणून मला जसा साथीदार पाहिजे तसा साथीदार यांच्यापैकी कोणातही मला दिसला नाही. आणि दिसलाही जरी असेल, तरी मी अनुभवावरून सांगू शकते की त्यांच्यापैकी कोणीही माझ्यासोबत लग्न करायला तयार होणार नाही. बहुतेक वेळा मला अजूनही एकटे-एकटेच वाटते; मी विचार करते (कदाचित अतिनाटकीय रीत्या): हे असं अजून किती दिवस चालणार? सदासर्वकाळ मी अविवाहितच राहणार आहे का? मी काय चूक केली आहे?

मी असफल झाले आहे या विचाराने कितीतरी रात्री एकाकीपणामुळे मी माझ्या हृदयाचे रडणे ऐकते.

माझ्या ज्या मैत्रिणींना माझ्याप्रमाणे वाट पाहावं लागलं नाही (कमीत कमी मी जितका काळ वाट पाहिला आहे तितका), त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काय वेगळं आहे याची मला मुळीच जाणीव नाही, मी असफल झाले आहे या विचाराने कितीतरी रात्री एकाकीपणामुळे मी माझ्या हृदयाचे रडणे ऐकते. ते माझ्यापेक्षा सडपातळ आहेत का? माझ्यापेक्षा सुंदर आहेत का? माझ्यापेक्षा चांगले आहेत का? त्यांनी सातत्यानं चांगलंच निवडलं आहे का? की त्यांना जे हवं आहे त्यापेक्षा कमी गोष्टींमध्ये, त्यांच्या योग्यतेपेक्षा कमी गोष्टींमध्ये त्यांनी समाधान मानलं आहे? की मीच अतिशय निवडक आहे?

मी गंभीर नातेसंबंधांमध्ये नव्हते असं नाही. मी ज्यांच्यासोबत नातेसंबंधात होते त्यांच्यापैकी एक सोडल्यास बाकी सर्वांशी मी स्वतः होऊन नातेसंबंध तोडलं होतं. सोबत मिळून जीवन जगण्याची आशा आणि प्रेम मला देऊ करण्यात आलं होतं आणि मी घाबरून गेले होते. की मी स्वार्थी होते. की मी उदासीन होते. की मी कदाचित योग्य तेच केलं होतं. मला वाटतं की खरं काय आहे ते मला कधीच कळणार नाही.

मला वाटतं की माझी वेळ निघून जात आहे आणि मी काहीच करू शकत नाही. विवाहित जोडप्यांच्या सान्निध्यात असताना मला अनेकदा एकटेपणा जाणवतो, पण मला स्वतःबद्दल कितीतरी गोष्टी शिकायला मिळत आहेत. जर अविवाहितपणाच्या भावनांशी तुम्हालाही संघर्ष करावा लागत असेल, तर तुम्ही तुमच्या संपर्काची माहिती खाल्ली नमूद करा. तुम्ही स्वतःच्या खऱ्या किंवा खोट्या नावाने माहिती देऊ शकता. ते तुमच्यावर अवलंबून आहे. आमच्यापैकी कोणीतरी लवकरच तुमच्याशी संपर्क करेल. तुम्हाला कदाचित एकटेपणा जाणवत असेल, पण तुम्ही एकटे नाहीत.

गोपनीयतेच्या कारणांमुळे लेखकाचे नाव बदलण्यात आले आहें
छायाचित्र सौजन्याने Joy Deb

तुम्ही एकटेच प्रवास करण्याची गरज नाही. एखाद्या सल्लागाराशी बोला. हे गोपनीय आणि नेहमी मोफत आहे.

या समस्यांना सामोरे जाणे कठीण होऊ शकते. तुम्ही स्वतःला किंवा इतरांना इजा करण्याचा विचार करत असाल, तर कृपया हे वाचा!

कृपया खाली दिलेल्या फॉर्ममध्ये तुमची माहिती नमूद करा म्हणजे लवकरच आम्ही तुमच्याशी संपर्क करू.अन्यथा सूचित केले नसल्यास, सर्व रखाणे आवश्यक आहेत.

तुमचा लिंग::
वय श्रेणी (आवश्यक)::

तुमच्यासाठी एक योग्य सल्लागार नेमण्यासाठी आम्ही लिंग आणि वय विचारतो सेवेच्या अटी & गोपनीयता धोरण .