Language हिन्दी / ਪੰਜਾਬੀ / ગુજરાતી / മലയാളം / தமிழ் / English

सेवेच्या अटी

सर्व वापरकर्त्यांनी येथे दिलेल्या मार्गदर्शनाचे पालन करणे गरजेचे आहे. तसे न केल्यास सेवा नाकारल्या जाऊ शकतात किंवा साईटवरील काही वैशिष्ट्यांसाठी ॲक्सेस नाकारला जाऊ शकतो.

आमच्या परस्परसंवादी समुदायाची जबाबदारी काय आहे ते या अटींमध्ये सांगण्यात आले आहे.“परस्परसंवादी” हा शब्द साईटवर जेथे वापरकर्त्यांना माहिती प्रस्तुत करण्याद्वारे सहभाग घेण्याची परवानगी आहे, त्या सर्व क्षेत्रांवर लागू होतो. यामध्ये, चॅटरूम्स, ब्लॉग्स, चर्चा करण्यासाठीचे बोर्ड्स, टिप्पण्यांसाठीचे फॉर्म्स, अभिप्राय यंत्रणा, सल्लागार सेवा, आणि वर्गणी सेवांचा वापर या गोष्टींचा समावेश आहे, पण हे या गोष्टींपुरतेच मर्यादित नाही. परस्परसंवादी क्षेत्रांपैकी कोणत्याही एकाचा वापर करण्याद्वारे, तुम्ही येथे दिलेल्या सेवेच्या अटींचे आणि सर्व मार्गदर्शनाचे पालन करण्यास सहमत आहात हे दाखवता. आम्ही असे मानतो की परस्परसंवादी समुदायाच्या वापरकर्त्यांनी या सेवेच्या अटींचे वाचन केले आहे आणि ते यांच्याशी सहमत आहेत, आणि अधूनमधून पुन्हा वाचन करण्याद्वारे, ते येथे करण्यात येणाऱ्या बदलांशी आणि नवीन मजकूराशी अवगत आहेत.

कोणत्याही समुदायात, स्वीकार्य वर्तणुकीच्या काही विशिष्ट अपेक्षा असतात. “द लाईफ प्रोजेक्ट” (पूर्वीची ट्रुथमिडिया) आणि “पॉवर टू चेंज” हे कृपा आणि सत्य या तत्त्वांवर ऑनलाईन समुदायांना प्रोत्साहन देतात. आम्ही महत्त्वाच्या आध्यात्मिक प्रश्नांच्या चर्चांना प्रोत्साहन देऊ इच्छितो. सहभाग घेणाऱ्या प्रत्येकाने वेगळे मत असलेल्या इतरांचा आदर करावा आणि त्यांना समजून घ्यावे ही विनंती आम्ही करत असलो, तरी आमच्या विश्वासाच्या विधानाशी असंगत असलेल्या माहितीवर किंवा सहभागावर मर्यादा घालण्याचा अधिकार आमच्याकडे सुरक्षित आहे. साईटच्या कोणत्याही परस्परसंवादी क्षेत्रात सहभाग घेण्याद्वारे तुम्ही या अटींना सहमती दर्शवता.

चॅटसाठी एक सुरक्षित आणि संवेदनशील वातावरण पुरवण्याचा आमचा नेहमी प्रयत्न असतो. तरीसुद्धा, तुम्ही स्वतःच्या जोखिमेवर यामध्ये सहभाग घेता. आदर आणि सभ्य वर्तन टिकवून ठेवण्यास आम्ही वचनबद्ध असलो, तरी आमचे परस्परसंवादी क्षेत्र प्रौढ लोकांसाठी तयार करण्यात आलेले आहेत. लहान मुलांच्या आणि तरुणांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आम्ही घेऊ शकत नाही. 13 वर्षांखालील मुले चॅट रूममधून बाहेर जावे असा आग्रह आम्ही त्यांना करतो.

मालकी

MyStruggles.in ही वेबसाईट “पॉवर टू चेंज मिनिस्ट्रीज”ची एक मिनिस्ट्री असलेल्या “द लाईफ प्रोजेक्ट” द्वारे संचालित केली जाते. या नेटवर्कचे संचालन “द लाईफ प्रोजेक्ट” आणि/किंवा “पॉवर टू चेंज मिनिस्ट्रीज” द्वारे केले जाते, आणि या नेटवर्कवरील बहुतेक साहित्याची मालकी “द लाईफ प्रोजेक्ट”कडे आहे. या नेटवर्कवर तृतीय-पक्षांचे साहित्यदेखील असू शकते आणि या नेटवर्कवर एखाद्या परवान्याद्वारे, अनुदानाद्वारे, किंवा तृतीय-पक्ष आणि “द लाईफ प्रोजेक्ट” यांच्यातील इतर एखाद्या कराराद्वारे पोस्ट केले जाऊ शकते.

“द लाईफ प्रोजेक्ट”ने या नेटवर्कची निर्मिती केली आहे, ते यासाठी की लोकांच्या आध्यात्मिक प्रवासात तुम्ही त्यांना जाणून घ्यावे, अनुभव करावे, आणि प्रेरित करावे. तरीसुद्धा, जेव्हा तुम्ही लागू होणाऱ्या सर्व कायद्यांशी, आणि या सेवेच्या अटींशी जे तुमच्यामधील आणि “द लाईफ प्रोजेक्ट”/“पॉवर टू चेंज मिनिस्ट्रीज” यांच्यामधील करार आहे, सहमत असाल फक्त तेव्हाच या नेटवर्कचा किंवा या नेवटर्कवर असलेल्या माहितीचा वापर (तुमचा ॲक्सेस किंवा वापर सहेतुक असो वा नसो) करण्याचा अधिकार तुम्हाला मिळेल. कृपया या सेवेच्या अटींचे काळजीपूर्वक वाचन करा. या नेटवर्कच्या बाबतीत तुम्हाला कोणतेही प्रश्न किंवा चिंता असल्यास, ते तुम्ही नेटवर्क प्रशासकाला [email protected] या ईमेलवर पाठवले पाहिजेत.

कोणत्याही वेळी कोणत्याही प्रकारची सूचना न देता या करारात बदल किंवा संशोधन करण्याचा हक्क “द लाईफ प्रोजेक्ट”ने स्वतःकडे सुरक्षित ठेवला आहे. म्हणून नवीन बदलांशी तुम्ही अवगत आहात याची खात्री करण्यासाठी तुम्ही नियमितपणे या पृष्ठाचे वाचन करणे महत्त्वाचे आहे.

जर एखाद्या व्यक्तीद्वारे या नेटवर्कचा गैरवापर केला जात असल्याचे तुमच्या लक्षात आल्यास, कृपया तुमच्या चिंताविषयी कळवण्यास नेटवर्क प्रशासकाशी संपर्क करा.

ॲक्सेस आणि वापर

या नेटवर्कवर असलेले सर्व साहित्य आंतरराष्ट्रीय व्यापारचिन्ह (ट्रेडमार्क) आणि कॉपीराईट कायद्यांद्वारे संरक्षित आहेत आणि म्हणून ते फक्त वैयक्तिक, वाणिज्येतर उद्देशांसाठी वापरले पाहिजेत. याचा अर्थ, या नेटवर्कवरून तुम्ही फक्त तुमच्या वैयक्तिक वापरासाठी साहित्य पाहू शकता किंवा डाऊनलोड करू शकता आणि त्यामुळे डाऊनलोड केलेल्या साहित्यासोबत कॉपिराईट आणि इतर स्वामित्वविषयक सूचना तशाच ठेवल्या पाहिजेत.

“द लाईफ प्रोजेक्ट”द्वारे लिखित स्वरूपातील सहमती प्राप्त केल्याशिवाय किंवा या नेटवर्कद्वारे स्पष्टपणे व्यक्त करण्यात आल्याशिवाय या नेटवर्कवरील माहिती पुनरुत्पादन करण्यास, प्रतिलिपी तयार करण्यास, वितरित करण्यास (ईमेलद्वारे, फॅक्सद्वारे किंवा इतर इलेक्ट्रॉनिक पद्धतींद्वारे), प्रकाशित करण्यास, बदल करण्यास, नक्कल करण्यास, किंवा प्रेषित करण्यास सक्त मनाई आहे. या मनाईच्या अंतर्गत असलेल्या साहित्यात, कोणत्याही मर्यादेविना, या नेटवर्कवर उपलब्ध असलेला कोणताही मजकूर, ग्राफिक्स, लोगो, फोटो, ऑडियो, किंवा व्हिडियो साहित्य किंवा दृकश्राव्य साहित्य समाविष्ट आहे. त्याच प्रकारे या नेटवर्कवरील साहित्याचा वापर इतर कोणत्याही वेब नेटवर्कवर किंवा नेटवर्क करण्यात आलेल्या संगणक वातावरणात वापरण्यास सक्त मनाई आहे. या नेटवर्कवर उपलब्ध असलेले ऑनलाईन साहित्य डिजिटल स्वरूपात पुनरुत्पादन किंवा वितरण करण्याच्या परवानगीच्या विनंतीसाठी तुम्ही [email protected] या ईमेलवर “द लाईफ प्रोजेक्ट”शी लिखित स्वरूपात संपर्क करू शकता.

तसेच, या नेटवर्कवर उपलब्ध असलेल्या साहित्यापासून किंवा साहित्याच्या आधारावरून कार्ये किंवा साहित्य निर्माण करणे, ज्यात कोणत्याही मर्यादेविना, फाँट्स, आयकन्स, लिंक बटण्स, वॉलपेपर्स, आणि गैरपरवाना विक्री साहित्याचा समावेश आहे, त्यास सक्त मनाई आहे. अशा प्रकारे तयार करण्यात आलेल्या साहित्याची विक्री, अदलाबदल, किंवा दान करणे, या सर्व गोष्टींवर ही मनाई लागू होते.

चर्चा बोर्ड्स, फोरम्स, चॅट रूम्स आणि ब्लॉग्स

या नेटवर्कच्या (एकत्रितपणे “समुदाय”) संबंधाने, किंवा नेटवर्कच्या आत चर्चा बोर्ड्स, फोरम्स, सल्लागार सेवा, चॅट रूम्स, बलॉग्स किंवा इतर सार्वजनिक क्षेत्रांमध्ये संदेश पोस्ट करण्यास, प्रेषित करण्यास किंवा प्रस्तुत करण्यास तुमचे स्वागत आहे. पण, सर्व संदेशांवर नियंत्रण ठेवण्याचा हक्क “द लाईफ प्रोजेक्ट”कडे सुरक्षित आहे.

समुदायांमध्ये प्रस्तुत केलेले संदेश पोस्ट केले जाण्याच्या आधी “द लाईफ प्रोजेक्ट” त्यांचे पुनरावलोकन करेलच असे नाही आणि त्यामुळे व्यक्त करण्यात आलेली मते किंवा धोरणे “द लाईफ प्रोजेक्ट”ची असतील असे नाही. समुदायातील संदेशांमध्ये असलेल्या माहितीबद्दल किंवा समुदायातील कोणत्याही संदेशाच्या आणि इतर साहित्याच्या अचूकतेबद्दल आणि विश्वसनीयतेबद्दल “द लाईफ प्रोजेक्ट” व्यक्त किंवा अव्यक्तपणे कोणतीही हमी देत नाही. तरीपण, समुदायांमध्ये साहित्य प्रस्तुत करण्यापासून तुम्हाला प्रतिबंध करण्याचे आणि तशा संदेशाचे संपादन करण्याचे, बंधन घालण्याचे, किंवा कोणत्याही वेळी कोणत्याही कारणाने तसे संदेश काढून टाकण्याचे हक्क “द लाईफ प्रोजेक्ट”कडे सुरक्षित आहेत.

ऑनलाईन समुदायांमध्ये अनुचित संदेशावर सक्रियपणे लक्ष ठेवण्याची जबाबदारी “द लाईफ प्रोजेक्ट” घेत नाही. जर कोणत्याही वेळी “द लाईफ प्रोजेक्ट” स्वतःच्या विवेकाने समुदायांवर लक्ष ठेवण्याची निवड केल्यास, “द लाईफ प्रोजेक्ट” संदेशांमधील माहितीबद्दल, अनुचित संदेशांमध्ये बदल करण्याबद्दल किंवा ते संदेश काढून टाकण्याबद्दल, आणि कोणताही संदेश प्रस्तुत करणाऱ्या वापरकर्त्याच्या वर्तनाबद्दल कोणतीही जबाबदारी घेत नाही. समुदायांमध्ये संदेश प्रस्तुत करताना, तुम्ही ऑनलाईन समुदायांच्या उद्देशांच्या अनुरूप चर्चा केल्या जाणाऱ्या विषयांपुरतेच स्वतःला मर्यादित ठेवण्यास सहमत आहात. “द लाईफ प्रोजेक्ट” तुमचे संदेश प्रस्तुत करण्यापासून तुम्हाला प्रतिबंध करण्याचे किंवा त्या संदेशांचे संपादन करण्याचे, बंधन घालण्याचे, किंवा काढून टाकण्याचे ठरवल्यास “द लाईफ प्रोजेक्ट” याची कोणत्याही प्रकारे जबाबदारी स्वीकार करत नाही याच्याशी तुम्ही सहमत आहात.

तुम्ही ऑनलाईन समुदायांमध्ये खालील प्रकारचे संदेश प्रस्तुत न करण्यास सहमत आहात:

तुम्ही याच्याशी सहमत आहात की तुमच्याद्वारे प्रस्तुत करण्यात आलेला कोणताही संदेश “द लाईफ प्रोजेक्ट”ची मालमत्ता बनते आणि म्हणून “द लाईफ प्रोजेक्ट”/”पॉवर टू चेंज मिनिस्ट्रीज”ला योग्य वाटेल त्या प्रकारे त्याचा वापर केला जाईल, नक्कल केली जाईल, उपपरवाना दिला जाईल, फेरफार करून वापर केला जाईल, संपादित केला जाईल, प्रेषित केला जाईल, वितरित केला जाईल, सार्वजनिक रीत्या सादर केला जाईल, प्रकाशित केला जाईल, प्रदर्शित केला जाईल, किंवा मिटवून टाकला जाईल.

समुदायांच्या संबंधाने किंवा त्यांच्या वापरामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही आणि सर्व प्रकारच्या उत्तरदायित्वांतून आणि जबाबदाऱ्यांतून तुम्ही “द लाईफ प्रोजेक्ट”, त्याच्या मूळ संस्था आणि त्याच्याशी संलग्न असलेल्या संस्था, तसेच त्यांचे कर्मचारी, एजंट्स, अधिकारी, संचालक, आणि भागधारक यांना मुक्त करण्यास सहमत आहात. जर तुम्ही कोणत्याही वेळी समुदायांच्या बाबतीत समाधानी नसाल किंवा समुदायांमधील कोणत्याही साहित्याबद्दल तुम्हाला आक्षेप असेल, तर त्यावर सर्वात चांगला उपाय म्हणजे त्यांचा वापर करणे थांबवणे.

लिंक केलेले नेटवर्क्स

जर “द लाईफ प्रोजेक्ट”/“पॉवर टू चेंज मिनिस्ट्रीज”ने इतर वेब नेटवर्क्सचे लिंक्स किंवा उपयुक्त माहिती किंवा सल्ला पुरवला असेल, तर असा तर्क करू नये किंवा असे गृहीत धरू नये आणि असे निरूपित करू नये की “द लाईफ प्रोजेक्ट”/“पॉवर टू चेंज मिनिस्ट्रीज” या वेब नेटवर्कशी जुळलेली आहे, त्यांचे परिचालन करते, किंवा त्यांचे नियंत्रण करते.

या नेटवर्कला लिंक करण्यात आलेल्या तृतीय-पक्ष वेब नेटवर्क्सवरील सामुग्री किंवा आचरणांबद्दल “द लाईफ प्रोजेक्ट”/“पॉवर टू चेंज मिनिस्ट्रीज” जबाबदार नाही. “द लाईफ प्रोजेक्ट”शी संलग्न किंवा संबंधित असलेल्या कंपन्यांद्वारे संचालित केले जाणारे इतर वेब नेटवर्क्सदेखील या नेटवर्कला लिंक केलेले असू शकतात. तरीपण, इतर वेब नेटवर्क्सला भेट देताना, तुम्ही या करारावार अवलंबून न राहता, इतर वैयक्तिक वेब नेटवर्क्सच्या “सेवेच्या अटी” पाहिल्या पाहिजेत.

उत्तरदायित्व आणि हमींचा अस्वीकार

या नेटवर्कच्या उत्तम कामगिरीसाठी “द लाईफ प्रोजेक्ट”/“पॉवर टू चेंज मिनिस्ट्रीज” सर्वतोपरी प्रयत्न करत असले, तरी तुम्ही या गोष्टीशी सहमत आहात की तुम्ही स्वतःच्या जोखिमेवर या नेटवर्कचा वापर करता आणि या नेटवर्कवर असलेल्या साहित्यावर अवलंबून राहता.

हा नेटवर्क, आणि या नेटवर्कवरील सर्व साहित्य, “आहे त्या सथितीत” आणि, कायद्याने परवानगी दिलेल्या पूर्ण मर्यादेपर्यंत, कोणत्याही प्रकारच्या व्यक्त किंवा अव्यक्त हमीविना पुरवण्यात आलेले आहेत. याचा अर्थ, कोणत्याही मर्यादेविना, “द लाईफ प्रोजेक्ट”/“पॉवर टू चेंज मिनिस्ट्रीज” याची हमी देत नाही की हा नेटवर्क एखाद्या विशिष्ट उद्देशासाठी अगदी योग्य आहे; की नेटवर्कवर असलेल्या साहित्यातील कार्यांमध्ये खंड पडणार नाही; की चुका सुधारल्या जातील; की नेटवर्क व्हायरसपासून आणि इतर नुकसानकारक घटकांपासून मुक्त आहे किंवा नेटवर्क परिपूर्ण, चूक विरहित किंवा भरवशालायक आहे.

तुम्ही हे मान्य करता की “द लाईफ प्रोजेक्ट”, त्याच्या मूळ आणि संलग्न संस्था, त्यासोबतच त्याचे स्वयंसेवक, कर्मचारी, एजंट्स, संचालक, अधिकारी, आणि भागधारक हे कोणत्याही प्रकारचा विलंब, दोष, विफलता, चुका, वगळले जाणे, व्यत्यय, मिटवले जाणे, कमतरता, व्हायरस, संचार विफल होणे, किंवा चोरी, नष्ट होणे, नुकसान किंवा तुमच्या संगणकाचा अनधिकृत ॲक्सेस यांसाठी उत्तरदायी नाहीत. तुम्ही मान्य करता की या नेटवर्कच्या संबंधाने सापडणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या बदनामीकारक, अपमानकारक, किंवा बेकायदेशीर वर्तनासाठी किंवा साहित्यासाठी “द लाईफ प्रोजेक्ट” उत्तरदायी नसणार, यामध्ये कोणत्याही माध्यमातून इतर एखाद्या व्यक्तीचे वर्तन किंवा प्रेषित केलेल्या साहित्याचा समावेश आहे.

तुम्ही मान्य करता की या नेटवर्कच्या तुमच्या वापरासंबंधाने किंवा वापरण्यास असमर्थ असण्याच्या संबंधाने उद्भवणाऱ्या कोणत्याही नुकसानीसाठी, ज्यामध्ये, कोणत्याही मर्यादेविना, प्रत्यक्ष, प्रासंगिक, विशेष, आनुषांगिक किंवा दंडात्मक नुकसानींचा समावेश आहे.

नुकसान भरपाई

तुमच्याद्वारे या नेटवर्कच्या वापरामुळे, या कराराच्या उल्लंघनामुळे किंवा उल्लंघन केल्याच्या दाव्यामुळे किंवा कॉपीराईट, व्यापारचिन्ह, मालकी, किंवा तृतीय-पक्षांच्या इतर हक्कांच्या उल्लंघनामुळे किंवा उल्लंघन केल्याच्या दाव्यामुळे उद्भवणाऱ्या सर्व उत्तरदायित्वांपासून आणि उत्तरदायित्वांविरुद्ध, दाव्यांविरुद्ध आणि खर्चांविरुद्ध (ज्यामध्ये वाजवी प्रमाणात वकिलांची फी आणि खर्चांचा समावेश आहे), तुम्ही “द लाईफ प्रोजेक्ट”, त्याची मूळ संस्था आणि संलग्न संस्था यांसह संबंधित स्वयंसेवक, कर्मचारी, एजंट्स, संचालक, अधिकारी यांचा बचाव करण्यास, नुकसान भरपाई करण्यास, आणि त्यांना नुकसानकारक न मानण्यास तुम्ही सहमत आहात.

कॉपीराईट सूचना

अन्यथा सूचित केले नसल्यास, या नेटवर्कवरील सर्व साहित्य, आणि अशा साहित्याचे संकलन, कॉपीराईट केलेले आहे. Copyright © 2016 पॉवर टू चेंज मिनिस्ट्रीज. या साईटवरील अनेक लेखांची मालकी वेगवेगळ्या लेखकांची आहे आणि त्यांच्या परवानगीने हे लेख वापरण्यात आलेले आहेत. तुम्हाला लेखांच्या पुनर्मुद्रणाची परवानगी हवी असल्यास किंवा कॉपीराईटबद्दल किंवा त्याच्या संभाव्य उल्लंघनाविषयी तुम्हाला प्रश्न असल्यास, कृपया [email protected] वर संपर्क साधा.

व्यापारचिन्ह सूचना

PowertoChange.com आणि त्याच्याशी संलग्न नेटवर्क्स हे “द लाईफ प्रोजेक्ट”ची व्यापारचिन्हे आहेत. “द लाईफ प्रोजेक्ट” हे “पॉवर टू चेंज मिनिस्ट्रीज”चे एक व्यापारचिन्ह आहे.

इतर

हा करार कायद्याने परवानगी दिलेल्या पूर्ण मर्यादेपर्यंत परिचालित आहे. या कराराच्या काही तरतुदी बेकायदेशीर, निरर्थक, अंमलबजावणी न करण्यायोग्य असल्यास, त्या तरतुदी या करारापासून विभक्त आहेत असे समजावे आणि त्यांचा उरलेल्या कोणत्याही तरतुदींच्या वैधतेवर आणि अंमलबजावणीवर कोणताही प्रभाव पडणार नाही.

चॅटमध्ये, तुम्ही, वापरकर्ता

आमचे परस्पसंवादी क्षेत्र सार्वजनिक आहेत. काही क्षेत्रांसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. सर्व परस्परसंवादी क्षेत्र नियंत्रकांच्या/प्रशासकांच्या एक संघाद्वारे निरीक्षणाच्या अधीन आहेत. कृपया लक्षात घ्या की संघाच्या एखाद्या सदस्याद्वारे किंवा प्रतिलिपीद्वारे सर्व चॅट संभाषणांचे निरीक्षण केले जाऊ शकते. वापरकर्ता सूचीत तुम्हाला जरी एखादा प्रशासक दिसत नसला, तरीही एक निरीक्षक उपस्थित असू शकतो.

  1. आमच्या साईटचा वापर कोणत्याही बेकायदेशीर कार्यासाठी केला जाऊ शकत नाही, वाईट, अशिष्ट, अश्लील, किंवा लैंगिक अर्थ असलेली भाषा, जातीवाचक किंवा द्वेषपूर्ण शब्द, किंवा तशा शब्दांच्या वर्णांचे अशा प्रकारे संयोजन करणे की त्यातून तसे शब्द सूचित होतील असे लेख पोस्ट करण्यासाठी केला जाऊ शकत नाही.
  2. अनुचित प्रकारचे उपनाव वापरल्यास प्रतिबंध लावण्यात येईल. परस्परसंवादी प्रशासकांच्या विवेकाच्या आधारावर काही वापरकर्त्यांना त्यांचे उपनाव बदलण्यास सांगितले जाऊ शकते. (लैंगिक अर्थ असलेल्या नावांना परवानगी दिली जाणार नाही.)
  3. केंद्रित चर्चांमध्ये सातत्याने व्यत्यय निर्माण करण्यास किंवा इतर सदस्यांवर नकारात्मक प्रभाव पडेल अशा प्रकारच्या वर्तनास परवानगी दिली जाणार नाही.
  4. आधीपासून ठरलेल्या विषयाच्या चॅटमध्ये, सर्व टिप्पण्या आणि प्रश्न सध्या सुरू असलेल्या चर्चेसंबंधी असले पाहिजेत अशी विनंती आम्ही करतो.
    **5. वरील सेवेच्या अटींचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन झाल्यास प्रतिसाद देण्याचा हक्क आमच्याकडे सुरक्षित आहे.
  5. सेवेच्या अटींचे उल्लंघन करणारे कोणतेही परस्परसंवादी साहित्य संपादित करण्याचा किंवा मिटवून टाकण्याचा हक्क आमच्याकडे सुरक्षित आहे.
  6. व्यक्त करण्यात आलेली मते होस्ट साईटची किंवा प्रशासकांची असतीलच असे नाही.**

चॅट होस्ट आणि प्रशासक
आमच्या परस्परसंवादी क्षेत्रांमध्ये नेतृत्व करण्यासाठी आणि चर्चा चालवण्यासाठी आमच्या संचालकांद्वारे प्रशासकांची नियुक्ती केली जाते. ते चॅटमधील चर्चा चालवतात आणि चर्चांमध्ये व्यत्यय आणणाऱ्यांसोबत व्यवहार करणेदेखील त्यांची जबाबदारी आहे. त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि रूमच्या सुरक्षिततेसाठी प्रशासकांचे वापरकर्ता नाव खुल्या चॅटमध्ये प्रदर्शित केले जात नाही. जर तुम्हाला त्यांच्यापैकी कोणाचे वापरकर्ता नाव कळले, तर त्याविषयी इतर वापरकर्त्यांसोबत चर्चा न करण्याद्वारे किंवा कोणत्याही वेळी ही माहिती खुल्या चॅटमध्ये प्रकट न करण्याद्वारे कृपया त्यांच्या खाजगीपणाचा आणि सुरक्षिततेचा आदर करा.

निरीक्षक

निरीक्षक आमच्या प्रशासक संघाचा एक सदस्य असून तो अधूनमधून चॅटरूमला भेट देईल. कृपया निरीक्षकाच्या सर्व विनंत्यांचे पालन करा. (साईटविषयी काही प्रश्न असल्यास, चॅट अभिप्राय फॉर्मचा वापर केला जाऊ शकतो.)

सल्लागार सेवा

या साईटवर उपलब्ध करण्यात आलेल्या संसाधनांमुळे तुम्हाला प्रोत्साहन आणि मदत मिळत आहे याची आम्ही आशा बाळगत असलो, तरी कृपया याची जाणीव बाळगा की ही एक सल्लागार सेवा नाही. तुम्ही प्रश्न प्रस्तुत करण्याद्वारे सहमती देता, की तुम्हाला देण्यात येणाऱ्या प्रतिसादामुळे किंवा उत्तरांमुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीसाठी किंवा नकारात्मक परिणामांसाठी येथील सल्लागार, या वेबसाईटचे प्रकाशक, त्यांच्याशी संलग्न असलेल्या संस्था, कर्मचारी, किंवा प्रायोजक जबाबदार नाहीत.

ईमेलच्या माध्यमातून देण्यात येणारा सल्ला हा सल्लागाराचा वैयक्तिक अनुभव आणि विश्वासाच्या आधारावर असतो. सल्लागारांची निवड योग्य चौकशी करून आणि सर्व सावधगिरी बाळगून करण्यात आली असली, तरी सल्लागाराद्वारे तुम्हाला देण्यात येणाऱ्या प्रतिसादामुळे किंवा उत्तरांमुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीसाठी किंवा नकारात्मक परिणामांसाठी या साईटच्या प्रकाशकांना, त्यांच्या संलग्न संस्थांना, कर्मचाऱ्यांना, किंवा प्रायोजकांना जबाबदार धरले जाऊ शकत नाही.

तुमच्या प्रश्नाचे आणि आमच्या उत्तराचे संपादन करून ऑनलाईन पोस्ट केले जाऊ शकते. प्रश्न पोस्ट करण्याच्या आधी तुमचे नाव आणि तुमच्या ओळखीशी संबंधित तपशील काढून टाकले जातील. तुमचा प्रश्न पोस्ट केला जाऊ नये अशी तुमची इच्छा असल्यास, तुमच्या मूळ ईमेलमध्ये तसे सूचित करा. सर्व प्रश्नांची उत्तरे वेळेवर देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू; पण त्वरित उत्तर देण्याची हमी आम्ही देऊ शकत नाही आणि एखादा प्रश्न योग्य नाही असे आम्हाला वाटल्यास आमच्या विवेकानुसार तो प्रश्न मिटवून टाकण्याचे, त्या प्रश्नाचे उत्तर न देण्याचे हक्क आमच्याकडे सुरक्षित आहेत.

जाहिराती आणि प्रसार साहित्य

कृपया जाहिराती दाखवण्याचे किंवा वैयक्तिक वेबसाईट्सच्या जाहिराती करण्याचे, किंवा कोणत्याही उद्देशासाठी पैशांची मागणी करण्याचे टाळा. जे वापरकर्ता जाहिराती करण्याचे/जाहिराती दाखवण्याचे/पैशांची मागणी करण्याचे थांबवत नाहीत त्यांच्यावर प्रतिबंध लावला जाईल.

चॅटमध्ये किंवा चर्चा बोर्डवर लिंक्स पोस्ट करणे

विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना साहाय्यक ठरतील असे लिंक्स आमच्या परस्परसंवादी क्षेत्रांमध्ये पोस्ट करण्याची परवानगी खालील अटींसह आम्ही वापरकर्त्यांना देतो:

  1. साईटच्या उद्देशाच्या अनुरूप लिंक्समध्ये सातत्य असले पाहिजे.
  2. लिंक्स हे जाहिराती नाहीत किंवा त्यांना जाहिराती समजले जाऊ शकत नाही. वैयक्तिक साईट्सच्या किंवा व्यवसायांच्या लिंक्सची परवानगी नाही.
  3. एखादा लिंक पुन्हापुन्हा पोस्ट करणे किंवा चर्चांमध्ये व्यत्यय निर्माण करणारे लिंक्स पोस्ट करणे अनुचित आहे आणि याला स्पॅमिंग समजले जाईल. यामुळे प्रतिबंध लावला जाऊ शकतो.
  4. जेव्हा एक प्रशासक तुम्हाला विनंती करतो की तुम्ही लिंक्स पोस्ट करू नये, तेव्हा कृपया त्यांच्या विनंतीचा सन्मान करा.
  5. चर्चा बोर्डच्या नोंदणीमध्ये वेबसाईटचे लिंक्स नसावेत. अशा प्रकारच्या नोंदणी मिटवल्या जाऊ शकतात.
  6. या साईटच्या होस्टद्वारे तृतीय-पक्ष लिंक्सना मान्यता दिली जाईलच असे नाही. इतरांकडून तुम्हाला देण्यात आलेल्या लिंक्सचे पुनरावलोकन करताना कृपया समजबुद्धीचा वापर करा.

प्रतिबंधित वर्तन

खालीलपैकी एखादी कृती केल्यास त्या कृतीला निंदा/उपहास/भांडणतंटा असे समजले जाईल, आणि परिणामस्वरूम प्रतिबंध लावला जाईल.

  1. प्रशासकांनी घेतलेले निर्णय इतरांना नकारात्मक पद्धतीने ईमेल करणे किंवा त्याविषयी नकारात्मक, भांडखोर पद्धतीने इतरांशी चर्चा करणे.
  2. इतर वापरकर्त्यांबद्दल कोणत्याही प्रकारे नकारात्मक किंवा निर्दयीपणे (उदा. उपहासात्मक) पद्धतीने चर्चा करणे.
  3. इतरांच्या स्पष्ट परवानगीविना त्यांच्याबद्दलची बातमी दुसऱ्यांना सांगणे, मग ती बातमी सकारात्मक असो वा नकारात्मक. लोकांना त्यांच्या स्वतःच्या कथा सामायिक करण्याची परवानगी द्या. जर इतर वापरकर्त्यांनी तुम्हाला त्यांच्यासाठी एखादा संदेश सामायिक करण्यासाठी सांगितला असेल, तर कृपया याची खात्री करा की तुम्ही त्यांच्या विनंतीनुसार तो संदेश सामायिक करत आहात हे रूममधील इतर वापरकर्त्यांना कळेल. याची खात्री करा की संदेशातील माहिती रूमच्या उद्देशांच्या अनुरूप आहे.
  4. इतर वापरकर्त्यांवर कोणत्याही प्रकारे “हल्ला करणे”, मग ते तुमच्या सामान्य वापरकर्ता नावाचा वापर करून असो वा वेगळ्या वापरकर्ता नावाचा वापर करून असो, यास सक्त मनाई आहे.
  5. जर इतर एखाद्या वापरकर्त्यासोबत समस्या निर्माण झाली असेल, तर कृपया तुम्हा दोघांमध्येच ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. जर असे करणे शक्य नसेल, तर कृपया चॅट अभिप्राय फॉर्मचा वापर करून साईटच्या नेतृत्वाकडे समस्या सादर करा. खाजगी गोष्टी सार्वजनिक फोरममध्ये आणू नका, जसे की चॅट किंवा ब्लॉगवर.
  6. एकाच वेळी अनेक वापरकर्त्यांप्रमाणे चॅट रूममध्ये प्रवेश केल्यास परिणामस्वरूप लगेच चॅटच्या बाहेर काढण्यात येईल.

मनोवृत्ती

खालील मनोवृत्तींमुळे आमचे परस्परसंवादी क्षेत्र सर्व भेट देणाऱ्या लोकांसाठी एक सुरक्षित ठिकाण बनवण्यास आम्हाला मदत मिळेल. या गोष्टींचे उल्लंघन केल्यास ताकीदीचे एक पत्र पाठवण्यात येईल, पण त्यानंतरही त्या क्षेत्रांत तसे करणे सुरू राहिल्यास परिणामस्वरूप प्रतिबंध लावला जाईल.

  1. सांस्कृतिक बाबतीत संवेदनशील असा. इतरांकडून आनंदाने शिकत राहा आणि कृपा दाखवा. आमच्या साईट्सना, जगभरातून वेगवेगळा दृष्टिकोन बाळगणारे आणि संस्कृतींचे लोक भेट देतात. कृपया प्रत्येकासोबत कृपेने वागा.
  2. आमच्या परस्परसंवादी क्षेत्रांचा उद्देश इतरसांसोबत वाद घालणे हा नाही.
  3. परस्परसंवादी क्षेत्रांमध्ये पुन्हापुन्हा तेच ते संदेश किंवा खूप लांब संदेश पोस्ट करून इतरांना चर्चांमध्ये सहभाग घेण्यापासून परावृत्त करू नका.
  4. विनोद करताना वेळ-काळाचे भान ठेवा.
  5. वापरकर्त्यांची ईमेल सूची निर्माण करू नका किंवा त्यांच्या स्पष्ट परवानगीशिवाय त्यांना ईमेल सूचींमध्ये सामील करू नका. ईमेल पत्त्यांना खाजगी माहिती समजली जाते. अधिकृत साईटच्या वृत्तपत्रिकेची वर्गणी करायची असल्यास, सक्रीनच्या वरील बाजूस असलेल्या वर्गणीच्या लिंकचा वापर करून करता येईल.
  6. एखाद्या व्यक्तीच्या समस्येबद्दल चर्चा करताना तुमच्या दृष्टिकोनावर इतका जोर देऊ नका, की चर्चेचे रूपांतर वादात होईल. लोक स्वतःचे निर्णय घेण्यास स्वतंत्र आहेत. वेगवेगळ्या मतांचे स्वागत आहे; एखादा निर्णय महत्त्वाचा असेल, तरीपण एक व्यक्ती सहमत न होण्याचा निर्णय घेत असेल, तर अशा वेळी नकारात्मक टिप्पण्या करणे अस्वीकार्य आहे.
  7. खाजगी चॅट वैशिष्ट्य प्रशासकीय संघाच्या वापरापुरते मर्यादित ठेवण्यात आले आहे.