Language हिन्दी / ਪੰਜਾਬੀ / ગુજરાતી / മലയാളം / தமிழ் / English

गोपनीयता धोरण

आम्ही कोण आहोत

द लाईफ प्रोजेक्ट (www.mystruggles.in चा संचालक) ही पॉवर टू चेंज मिनिस्ट्रीजची (P2C) एक मिनिस्ट्री आहे, जी कँपस क्रूसेड फॉर क्राईस्ट इंटरनॅशनलचा (CCCI) भाग आहे, जी एक जागतिक प्रचार सेवा आणि शिष्य बनवण्याची सेवा आहे आणि 160 देशांमध्ये याचे प्रातिनिधिक स्थानिक मिनिस्ट्रीज आहेत. P2C ही P2C आणि P2C च्या अंतर्गत काम करणाऱ्या इतर कितीतरी स्थानिक मिनिस्ट्रीजनी बनलेली आहे. या संपूर्ण दस्तऐवजामध्ये “आम्ही” आणि “आमचे/आमच्या” हे संपूर्ण संघटनेला आणि व्यक्तिगत क्षेत्रीय मिनिस्ट्रीजला सूचित करते, आणि “तुम्ही” आणि “तुमचे/तुमच्या” हे कोणत्याही आणि सर्व मिनिस्ट्री सहयोगींना आणि सार्वजनिक साईट वापरकर्त्यांना सूचित करते.

तुमच्याप्रती आमची वचनबद्धता

तुमच्या खाजगी आणि वैयक्तिक माहितीचे संरक्षण करण्यासाठी आणि ती माहिती योग्य रीतीने हाताळण्यासाठी आणि तुमच्या गोपनीयतेला गंभीरतेने घेण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. या गोपनीयता धोरणात आम्ही तुमची वैयक्तिक माहिती किंवा वैयक्तिक डाटा कशा प्रकारे गोळा करतो, प्रक्रिया करतो, वापर करतो, उघड करतो याचे वर्णन करण्यात आले आहे.

आम्ही तुमच्या माहितीचे संरक्षण कसे करतो

तुमच्या माहितीची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची आहे. आम्ही गोळा करत असलेल्या माहितीचे संरक्षण करण्यासाठी P2C ने सुरक्षेसंबंधी पावले उचललेली आहेत. पण, कोणतीही वेबसाईट किंवा इंटरनेटवरील प्रसारण पूर्पपणे सुरक्षित नसते. आम्ही तुम्हाला आग्रह करतो की तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी काही जरूरी पावले उचला, जसे की कठीण पासवर्ड वापरा आणि पासवर्ड इतर कोणालाही सांगू नका, सोबतच तुमच्या वापरकर्ता खात्यातून लॉग आऊट करा, आणि सार्वजनिक किंवा असुरक्षित उपकरणावर P2C चा वापर केल्यानंतर ब्राउझर बंद करा.

आमच्या काही यंत्रणांमध्ये तुमची वैयक्तिक ओळख पटेल अशी माहिती कॅनडाच्या बाहेर तृतीय-पक्ष सेवा पुरवणाऱ्यांच्या सेवांचा वापर करून माहिती साठवणे आणि प्रक्रिया करणे समाविष्ट आहे. तुमची वैयक्तिक ओळख पटेल अशी माहिती इतर पक्षांना पुरविली जाते तेव्हा त्याचे संरक्षण करण्यासाठी करारात वचनबद्धता प्राप्त करणे यांसारख्या सर्व उपाययोजना आम्ही केलेल्या असल्या, तरी तुमची वैयक्तिक ओळख पटेल अशी माहिती कॅनडाच्या बाहेर साठवली किंवा प्रक्रिया केली जाणार असेल, तर त्या कार्यक्षेत्रांतील कायदे त्या बाबतीत लागू केले जातील.

तरीसुद्धा, ही गोष्ट वैयक्तिक डाटाच्या बाबतीत लागू होत नाही—जसे की पाठवणाऱ्यांचे आणि/किंवा प्राप्त करणाऱ्यांचे ईमेल पत्ते—जे तुमच्या संगणकाच्या आणि आमच्या सर्व्हर्सच्या मार्गात असताना साधारण ईमेलच्या नोंदींमध्ये समाविष्ट असतात, अशा वेळी या नोंदींना सार्वजनिक डाटा असे गृहित धरले पाहिजे.

आम्ही तुम्हाला संवेदनशील किंवा खाजगी माहिती जसे की क्रेडिट कार्ड तपशील असलेल्या नोंदी कधीही पाठवत नाही, आणि आम्ही तुम्हाला आग्रह करतो की तुम्हीदेखील अशी माहिती तुमच्या ईमेलमध्ये ठेवू नये.

तुमच्याकडून किंवा तुमच्याविषयी आम्ही कोणती माहिती गोळा करतो

वैयक्तिक माहिती

या गोपनीयता धोरणाच्या अंतर्गत, वैयक्तिक माहिती म्हणजे एका व्यक्तीच्या व्यावसायिक संपर्काच्या माहितीव्यतिरिक्त त्या व्यक्तीची ओळख पटेल अशी कोणतीही माहिती जी जेव्हा गोळा केली जाते, तेव्हा त्या व्यक्तीच्या व्यावसायिक जबाबदारीच्या संदर्भात तिच्याशी संपर्क करण्याच्या उद्देशाने वापर करण्यासाठी किंवा उघड करण्यासाठी त्या व्यक्तीला समर्थ करते.

तुमच्याकडून आम्ही गोळा करत असलेल्या वैयक्तिक माहितीचे प्रकार

खात्याची माहिती. तुम्ही जेव्हा आमच्या कोणत्याही साईटवर तुमचे खाते तयार करता, माहितीची विनंती करता, साहित्य विकत घेता किंवा P2C ला किंवा आमच्या मिनिस्ट्रीजला दान देता, तेव्हा आम्ही तुमच्या संपर्काची माहिती गोळा करतो, जसे की: नाव, पत्ता, फोन क्रमांक, बिलिंगचा पत्ता (वेगळा असल्यास), पेमेंटची माहिती ज्यात क्रेडिड कार्डची माहिती (नाव, क्रेडिट कार्ड क्रमांक आणि क्रेडिट कार्ड समाप्ती दिनांक) आणि ऐच्छिक स्वरूपात ईमेल पत्ता समाविष्ट आहे.

दळणवळण. तुम्ही जेव्हा आमच्याशी (ईमेल, फोन, संपर्क फॉर्म किंवा इतर प्रकारे) दळणवळण करता, तेव्हा आम्ही दळणवळणाचा अहवाल सांभाळून ठेवतो.

तुमच्या हालचालींविषयी स्वयंचलितपणे गोळा केलेली माहिती. केवळ आमच्या कोणत्याही वेबसाईट्सवरील तुमच्या हालचालींविषयी माहिती गोळ्या करण्यासाठी आम्ही कुकीज, किंवा ट्रॅक करणाऱ्या इतर तंत्रज्ञानांचा वापर करू शकतो. आमच्या वेबसाईट्सच्या वापराशी संबंधित जी माहिती तुमचे संगणक किंवा मोबाईल उपकरण आम्हाला पुरवतात, जसे की ब्राउझरचा प्रकार, संगणकाचा किंवा मोबाईल उपकरणाचा प्रकार, ब्राउझरची भाषा, आयपी पत्ता, मोबाईल कॅरियर, युनिक डिव्हाइस आयडेंटिफायर, ठिकाण, आणि विनंती केलेले आणि संदर्भित केलेले URL वगैरेची माहितीदेखील आम्ही गोळा करू शकतो आणि साठवून ठेवू शकतो.

आम्ही तुमच्या माहितीचा वापर कशा प्रकारे करतो

तुम्ही जर आमच्या कोणत्याही वेबसाईटला भेट दिली तर आम्ही तुमच्या संगणकात एक कुकी साठवून ठेवतो. (स्पष्टीकरणासाठी कुकीजवरील विभाग पाहा). त्यासोबतच, यंत्रणा प्रशासन, एकीकृत सांख्यिकी माहितीची गणना करणे, सर्वसामान्य वापराच्या अहवालांची ओळख पटवणे, आणि आमच्या वेबसाईट्सला भेट देणाऱ्या सर्वांच्या सर्व ट्रॅफिकचे मापन करणे या उद्देशाने आम्ही तुमचे आयपी पत्ते गोळा करतो. या माहितीमुळे वैयक्तिक वापरकर्त्यांची ओळख पटत नाही, पण याचा वापर सामान्य सांख्यिकीच्या आणि लेखापरीक्षणाच्या उद्देशांसाठी केला जाऊ शकतो.

आम्ही तुमची वैयक्तिक माहिती (जसे की तुमचे नाव आणि संपर्काची माहिती) तृतीय-पक्षांना त्यांच्या स्वतःच्या मार्केटिंग उद्देशांसाठी विकत नाही. आम्ही गोळा करत असलेली तुमची माहिती P2C आमच्या संघटनेच्या किंवा आमच्या मिनिस्ट्रीजच्या आंतरिक कार्यांसाठी खालील उद्देशाने वापर करू शकते:

जर तुम्ही कॅनडाच्या बाहेर राहत असाल, तर आम्ही ही माहिती आमच्या एखाद्या मिनिस्ट्रीला किंवा तुमच्या क्षेत्रातील आमच्या प्रतिनिधीला उपलब्ध करून देऊ शकतो, जेणेकरून ते तुमच्याशी संपर्क करू शकतील.

आम्ही तुमची माहिती कशा प्रकारे सामायिक करतो

जेथे व्यक्तींनी अन्यथा सहमती दिली असेल, तेथे आम्ही खाली नमूद केल्याप्रमाणे माहिती सामायिक करतो:

सेवा पुरवणारे. आम्ही तुमची माहिती तृतीय-पक्ष सेवा पुरवणाऱ्यांशी सामायिक करतो, जे आम्हाला सेवा पुरवण्यासाठी तुमच्या माहितीचा वापर करतात, जसे की पेमेंट प्रक्रिया करणारे, होस्टिंग सेवा पुरवणारे, लेखापरिक्षक, सल्लागार, तसेच आमच्या मिनिस्ट्रीच्या कार्यांची माहिती पुरवण्यात आम्हाला साहाय्य करणारे.

संलग्न असलेले. तुमच्याविषयी गोळा केलेल्या माहितीचा वापर मिनिस्ट्रीजद्वारे किंवा P2C च्या प्रतिनिधींद्वारे केला जाऊ शकतो किंवा माहिती त्यांच्याशी सामायिक केली जाऊ शकते, जे या माहितीचा वापर आणि या गोपनीयता धोरणाच्या अंतर्गत तुमची वैयक्तिक माहिती उघड केली जाते.

कायद्याने आवश्यक. तुमची माहिती कायद्याद्वारे उघड करणे आवश्यक असल्यास, आम्ही तुमची माहिती उघड करू शकतो.

हक्कांचे संरक्षण. आमच्याविरुद्ध करण्यात आलेल्या दोषारोपांना प्रतिसाद देण्यासाठी, किंवा कायदेशीर प्रक्रियांचे पालन करण्यासाठी (उदा. न्यायालयात हजर राहण्याचा आदेश किंवा वॉरंट), आमच्या करारांची आणि अटींची अंमलबजावणी किंवा प्रशासनासाठी, फसवणूक टाळण्यासाठी, जोखिमांच्या मूल्यांकनासाठी, चौकशीसाठी, आणि P2C चे, त्यांच्या वापरकर्त्यांचे, किंवा इतरांच्या हक्कांचे, मालमत्तेचे किंवा सुरक्षिततेचे संरक्षण करण्यासाठी, जेथे आम्हाला विश्वास वाटतो की माहिती उघड करणे आवश्यक आहे तेथे आम्ही असे करू शकतो.

कुकीज, पिक्सेल्स आणि ट्रॅकिंग

आमच्या वेबसाईट्सचा वापर आणि ब्राउझिंग हालचालींविषयी तुमची माहिती स्वयंचलितपणे गोळा करण्यासाठी आणि त्याची नोंद करण्यासाठी आम्ही कुकीज, स्पष्ट GIF/पिक्सेल टॅग्स, जावास्क्रिप्ट, स्थानिक साठवणूक, लॉग फाईल्स, आणि इतर तंत्रज्ञानांचा वापर करू शकतो. वापरकर्त्यांविषयी गोळा केलेली ही माहिती आम्ही इतर माहितीसोबत एकीकृत करू शकतो. खाली या हालचालींविषयी थोडक्यात सारांश दिलेला आहे:

तृतीय-पक्ष वेबसाइट्सवर जाहिरात करण्यासाठी

तुम्हाला आमच्या मिनिस्ट्रीजविषयी, मिनिस्ट्रीच्या कार्यांविषयी, आणि ऑनलाईन सल्लागार सेवांविषयी माहिती पुरवण्यासाठी आम्ही तृतीय-पक्षांचा, जसे की समाज माध्यम वेबसाईट्सचा वापर करू शकतो. हे तृतीय-पक्ष वेबसाईट्स माहिती गोळा करण्यासाठी तृतीय-पक्ष कुकीजचा, वेब बीकन्सचा, किंवा यांसारख्या इतर तंत्रज्ञानांचा वापर करू शकतात. ते तुमचा उपकरण आयडेंटिफायर, आयपी पत्ता, किंवा जाहिरातीसाठी आयडेंटिफायर (IDFA) यांबद्दलची माहिती गोळा करू शकतात. तृतीय-पक्ष गोळा करत असलेल्या या माहितीचा वापर आम्ही आमच्या साईट्सवर पुरवत असलेली किंवा इंटरनेटवर इतरत्र असलेली माहिती तुम्हाला आणखी जास्त अनुकूल करण्यासाठी करू शकतो. तृतीय-पक्ष कुकीज तृतीय-पक्षांच्या गोपनीयता धोरणाच्या अंतर्गत कार्य करतात.

तृतीय-पक्षाचे जाहिरातीशी संबंधित कुकीज आणि तुम्ही त्यांच्यापासून स्वतःला कसे वगळू शकता याविषयीच्या माहितीसाठी, कृपया खाली दिलेल्या एखाद्या तृतीय-पक्षाच्या वेबसाईटला भेट द्या:

तुमची माहिती गोळा करण्याविषयी आणि वापरण्याविषयी सहमती देणे

येथे वर्णन केल्याप्रमाणे, आमच्या ऑनलाईन संसाधनांपैकी एखाद्याचा वापर करून तुम्ही आम्हाला तुमची वैयक्तिक ओळख पटवणारी माहिती गोळा करण्याची आणि त्या माहितीचा वापर करण्याची परवानगी देता, ज्यामध्ये खालील गोष्टी समाविष्ट आहेत, पण इतक्यापुरतेच मर्यादित नाहीत:

आमच्या गोपनीयता धोरणात बदल

आम्ही जर आमच्या गोपनीयता धोरणांमध्ये आणि प्रक्रियांमध्ये बदल केली, तर ते बदल आम्ही या पृष्ठावर उपलब्ध करून देऊ. आम्ही जर या गोपनीयता धोरणात कोणतेही बदल केले ज्यामुळे आम्ही तुमच्या माहितीचा वापर कशा प्रकारे करतो याविषयी त्यात बदल असले, तर अशा बदलांबद्दल तुम्हाला सूचित करण्यासाठी आम्ही सर्व प्रकारे प्रयत्न करू, जसे की, आमच्या वेबसाईट्सवर प्रामुख्याने सूचित करण्याद्वारे किंवा आमच्याकडे नोंदणीकृत असलेल्या तुमच्या ईमेलवर सूचना देण्याद्वारे, आणि कायद्याने आवश्यक असल्यास, आम्ही तुमची सहमती घेऊ किंवा स्वतःला या बदलातून वगळण्याची तुम्हाला संधी देऊ.

तुमची वैयक्तिक माहिती ॲक्सेस करणे, अद्ययावत करणे, किंवा मिटवणे

जर तुम्हाला विश्वास असेल की आमच्याकडे असलेली तुमची वैयक्तिक माहिती चुकीची आहे, किंवा आमच्याकडे असलेली कोणतीही माहिती काढून टाकण्याची तुमची इच्छा आहे, तर ती वैयक्तिक माहिती अद्ययावत करण्यासाठी किंवा मिटवून टाकण्यासाठी तुम्ही आमच्या गोपनीयता अधिकाऱ्याशी संपर्क करा. तुमच्याशी संपर्क करण्यासाठी विविध माध्यमांद्वारे गोळा करण्यात आलेल्या वैयक्तिक माहितीचा वापर आम्ही करू नये अशी तुमची इच्छा असल्यास, कायद्याची आवश्यकता किंवा परिचालनाची आवश्यकता या गोष्टी वगळता, आम्ही तुम्हाला कोणत्याही प्रकारे पत्र किंवा ईमेल पाठवण्यावर मर्यादा घालावी किंवा तुम्हाला मुळीच पाठवू नये याची विनंती करू शकता. तुमची माहिती अद्ययावत करण्यासाठी किंवा मिटवून टाकण्यासाठी किंवा या गोपनीयता धोरणाविषयी आणखी जास्त तपशीलांची विनंती करण्यासाठी, कृपया खाली सांगितल्याप्रमाणे गोपनीयता अधिकाऱ्याशी संपर्क करा:

कोणतीही कारवाई करण्याच्या आधी सुरक्षितता कारणांमुळे ओळख सत्यापित करणे गरजेचे आहे, आणि तुम्हाला याची जाणीव असेलच की कायदेशीर कारणांमुळे किंवा परिचालनाच्या आवश्यकतांमुळे जतन केलेली काही विशिष्ट माहिती मिटवून टाकली जाऊ शकत नाही. .

मुलांच्या गोपनीयतेचे संरक्षण (13 वर्षां खालील)

आमचे वेबसाईट्स जरी प्रौढ लोकांच्या वापरासाठी असले, तरी आम्ही तरुण लोकांसाठीदेखील ऑनलाईन संसाधने पुरवण्याची निवड करू शकतो. आमच्यासाठी लहान मुलांच्या सुरक्षिततेचे आणि गोपनीयतेचे संरक्षण करणे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. म्हणून, मुंलाविषयीची वैयक्तिक ओळख पटविणारी माहिती गोळा करण्यापूर्वी पालकांची सत्यता पडताळून पाहण्यायोग्य सहमती आम्ही प्राप्त करू आणि पालकांची सत्यता पडताळून पाहण्यायोग्य सहमती असल्याशिवाय वैयक्तिक ओळख पटेल अशी संपर्काची माहिती सार्वजनिक रीत्या पोस्ट करण्याची किंवा इतर प्रकारे वितरित करण्याची परवानगी आम्ही जाणूनबुजून मुलांना देणार नाही.

आमच्या गोपनीयता धोरणाच्या मर्यादा

बुलेटिन बोर्ड्सवर, चॅट रूम्समध्ये, ईमेल नोंदींमध्ये किंवा आमच्याद्वारे पुरवलेल्या इतर सार्वजनिक फोरममध्ये तुमच्याद्वारे स्वेच्छेने उघड केलेला कोणताही वैयक्तिक डाटा तृतीय-पक्षांद्वारे ॲक्सेस केला जाण्याची आणि त्यांच्या वैयक्तिक लाभासाठी वापरासाठी उपयोग केला जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही आणि त्यामुळे ते आमच्या गोपनीयता धोरणाच्या अंतर्गत येत नाही. याव्यतिरिक्त, आमच्या कोणत्याही वेबसाईट्सला लिंक करण्यात आलेले बाहेरील वेबसाईट्स कदाचित आमच्या गोपनीयता धोरणाचे पालन करत नाहीत, आणि त्यामुळे ते ज्या नियमांच्या अंतर्गत कार्य करतात ते समजून घेण्यासाठी तुम्ही त्यांचे गोपनीयता धोरण पाहणे गरजेचे आहे.