Language हिन्दी / ਪੰਜਾਬੀ / ગુજરાતી / മലയാളം / தமிழ் / English

आम्ही काळजी का करतो

आम्ही प्रेम करतो कारण आधी त्याने प्रेम केले - १ योहान ४:९

आम्ही काळजी करतो कारण आम्ही अशा लोकांचा समुदाय आहोत (ऑनलाईन आणि व्यक्तिगत रीत्या दोन्ही) ज्यांना आपले स्वतःचे संघर्षदेखील आहेत. आम्हाला माहीत आहे की समस्यांना गोपनीय ठेवल्याने त्या आपल्यावर प्रबळ होतात, पण इतरांवर भरवसा ठेवून त्यांच्याशी समस्यांबद्दल बोलल्याने आपल्या प्रवासात आपल्याला ताकत आणि बुद्धी प्राप्त होते.

आमच्या संघर्षात आम्हाला येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्याने आणि प्रेमाने अद्भुत आशेसोबतच, शांती आणि आनंद या गोष्टी प्राप्त झाल्या आहेत. आम्ही ही सुवार्ता आमच्यापुरतीच मर्यादित ठेवू इच्छित नाही. आशा, शांती, बळ, आणि आनंद प्राप्त करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या इतरांना मदत करण्यास आम्ही उत्सुक आहोत, जेणेकरून तेदेखील देवाने त्यांच्यासाठी योजना केलेल्या अद्भुत जीवनात प्रवास करू शकतील.

कृपया आम्ही तुम्हाला कशा प्रकारे मदत करू शकतो ते आम्हाला कळवा.

देव आपल्यावर निःस्वार्थपणे प्रेम करतो आणि आपल्या संघर्षांवर मात करण्यास आपल्याला मदत करू इच्छितो. ही मदत अनुभव करण्यासाठी आधी आपण त्याच्यासोबत एका वैयक्तिक नातेसंबंधात प्रवेश केला पाहिजे. त्या नातेसंबंधाविषयी येथे सांगितलेले आहे.

या जगात आणि स्वतःच्या जीवनात सुधारणा करण्याची बहुतेक लोकांची प्रबळ इच्छा आहे. का? कारण खोलवर जाऊन त्यांना माहीत आहे की हे जग जसे असायला पाहिजे तसे मुळीच नाही. हे जग अजूनही अनेक मार्गांनी भंग पावलेले आहे, आणि आपणदेखील आहोत. आपण सर्व जण सृष्टीच्या सुरुवातीपासून देव लिहित असलेल्या मुक्ती आणि उपचाराच्या कथेचा भाग आहोत.

जीवनासाठी निर्मिती करण्यात आली

आपण जीवनाचा संपूर्ण आनंद घ्यावा यासाठी देवाने आपली निर्मिती केली आहे. त्याला वैयक्तिक रीत्या जाणून घेण्याच्या मध्ये कोणतीही गोष्ट यऊ नये. तुम्ही स्वतः दुःखी होऊ नये किंवा इतरांना दुःखी करू नये. त्याने बनवलेल्या परिपूर्ण जगाचा तुम्ही आनंद घ्यावा. प्रत्येक दिवशी तुमच्या जीवनात आनंद, उद्देश आणि अर्थ असावा. “मग प्रभू देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य बनवला आणि मनुष्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला आणि मनुष्य जिवंत प्राणी झाला” (उत्पत्ती २:७).

जीवनापासून दूर

पण आपण समाधानी नव्हतो. पहिल्या मानवांनी देवाकडे आणि तो देत असलेल्या अद्भुत जीवनाकडे पाठ फिरवली. अशा प्रकारे मृत्यू आणि दुःख आणि दुष्टता आणि एकाकीपणा या जगात शिरल्या. एका बंडखोर कृत्यामुळे, देवासोबतचा नातेसंबंध तुटला. हे “योग्य नाही,” आपण कदाचित म्हणू. पण आपण सर्व जण पापी आहोत. आपल्याला माहीत आहे, की आपणही तीच गोष्ट करतो: आपण स्वतःला प्रथम स्थान देऊ इच्छितो, देवाच्या मार्गांऐवजी स्वतःच्या मार्गांची निवड करतो. “कारण पापाची मजुरी मरण आहे, पण देवाची देणगी म्हणजे आपल्या प्रभू ख्रिस्त येशूमध्ये अनंतकाळचे जीवन आहे.” (रोमकरांस ६:२३).

जीवनासाठी पुनःस्थापित

येशू आपल्याला पुन्हा जीवन देऊ शकतो. क्रूसावर देवाचा पुत्र आपल्यासाठी मरण पावला. त्याने आपल्या बंडखोरीची पूर्ण किंमत फेडली आणि दुष्टतेवर विजय मिळवला. मग हे सिद्ध करण्यासाठी तो पुन्हा जिवंत झाला. आता तो त्याच्यावर आणि त्याने आपल्यासाठी जे केले त्यावर विश्वास ठेवण्यास तयार असलेल्या प्रत्येकाला पूर्ण, सत्य जीवन देऊ इच्छितो. ही एक मोफत देणगी आहे, पण त्याची किंमत आहे आपला गर्विष्ठपणा. जेव्हा आपण स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत नाही तेव्हा आपला बचाव होतो आणि त्याऐवजी आपण येशूवर इतका विश्वास करतो की त्याला आपले सर्वस्व देतो.

“मी यासाठी आलो की त्यांना जीवन मिळावे, आणि तेही भरपूर मिळावे” (योहान 10:10ख). “पण ती आता आपला तारणारा ख्रिस्त येशू याच्या अवतीर्ण होण्याने प्रकट करण्यात आली आहे, ज्याने मरणाचा नाश केला आणि सुवार्तेद्वारे जीवन आणि अमरत्व प्रकाशात आणले” (2 तीमथ्य १:१०).

जीवनाची निवड करा

तुम्ही एक निवड करू शकता. या वेळेपासून तुमचे जीवन दोनपैकी फक्त एका दिशेने जाऊ शकते: येशू देत असलेल्या अद्भुत जीवनापासून स्वतंत्र होऊन तुम्ही स्वतःच्या जीवनावर अधिकार गाजवा.

किंवा

येशूला तुमचे जीवन द्या आणि देवासोबत एका नातेसंबंधाची सुरुवात करा जी तुम्हाला आतून-बाहेरून बदलून टाकायला सुरुवात करते. तुमच्या जीवनाला उद्देश आणि अर्थ मिळेल आणि क्षमा प्राप्त झाल्याचा आनंद तुम्ही अनुभवू शकता. तुम्हाला कळेल की तुम्ही तुमच्या गतकाळापासून बरे होत आहात आणि खऱ्या अर्थाने कसे प्रेम करायचे हे तुम्ही शिकाल. तुम्ही पूर्णपणे जिवंत व्हाल.

त्या जीवनाची निवड कशी करायची

“जर तू तुझ्या तोंडाने ‘येशू प्रभू आहे’ असा विश्वास धरल्यास आणि आपल्या अंतःकरणात देवाने त्याला मेलेल्यांतून उठवले असा विश्वास धरल्यास तुझे तारण होईल” (रोमकरांस 10:9).

तुमचे जीवन येशूला सोपवण्यात मदत मिळण्यासाठी येथे एक प्रार्थना सुचवत आहोत:

“देवा, खूप काळापासून मी माझ्या मर्जीनुसार जीवन जगलो आहे. संघर्ष करून मी खूप थकलो आहे. मी विश्वास धरतो की मला माझ्या स्वार्थी जीवनापासून मुक्त करण्यासाठी येशू मरण पावला. कृपया माझे पाप माफ कर. मी आभार मानतो की येशूच्या मृत्यूनंतर तो त्याच अवस्थेत नाही राहिला. तू त्याला जीवनासाठी पुन्हा उठवले. मी तुझ्याकडून नवीन जीवनाची मोफत देणगी स्वीकार करतो. आता माझे जीवन तुझेच आहे. कृपया तुझ्या मार्गांप्रमाणे जीवन जगण्यासाठी मला मदत कर. आमेन.”

तुम्ही नुकतेच येशूचे अनुकरण करण्याची निवड केली असल्यास कृपया आम्हाला कळवा. तुम्ही जर खाली दिलेल्या फॉर्ममध्ये तुमची माहिती नमूद केली, तर तुमच्या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी आणि तुमच्यासोबत प्रार्थना करण्यासाठी एखादा सल्लागार तुमच्याशी लवकरच संपर्क करेल.

मला आणखी प्रश्न आहेत