हानीच्या मार्गाने जगणे
मी तिसरीत असताना, मी एका मित्राला विचारले की तो माझ्यासोबत झोपू शकतो का. तो दुसऱ्या दिवशी परत आला आणि म्हणाला, "माझ्या आईवडिलांनी 'नाही' म्हटले कारण तुझे आई-वडील मद्यपी आहेत." तोच क्षण मला लागला: माझे कुटुंब हे सामान्य नाही. माझे पालक मद्यपी आहेत. माझ्या पालकांच्या जीवनातील प्रत्येक पैलू मद्यपानाच्या भोवती फिरत आहे; हे सर्व मला माहीत होते.
जेव्हा मी आणि माझी बहीण दुसर्या कुटुंबासोबत जेवलो तेव्हा वास्तवत: मला आणखी धक्का बसला. तेथे मद्यपान किंवा मारामारी नव्हती. तर ते खेळ खेळले आणि एकत्र मजा करत होते. आम्ही आमच्या घरामध्ये सुरक्षतेपासून दूर आहोत हे शिकायला आम्हाला जास्त वेळ लागला नाही, म्हणून आम्ही शक्य तितक्या लवकर त्यापासून दूर पळण्याचा प्रयत्न केला. माझे काका जवळपास राहत होते म्हणून कधी कधी आमच्या पालकांचे मद्यपान आणि भांडण नियंत्रणाबाहेर जायचे तेव्हा आम्ही रात्रीसाठी तिथे पळून जायचो. सकाळी परत आल्यावर कधी-कधी घरामध्ये तुटलेले फर्निचर आणि तुटलेली भांडी याने अस्ता व्यस्त असायचे.
मी अनेकदा माळ्यावर जायचो, जेथे माझी झोपण्याची खोली होती, पण तीसुद्धा काही जास्त सुरक्षित जागा नव्हती. मी तेथे अजूनही माझ्या पालकांना त्यांच्या खाली असलेल्या बेडरूममधून एकमेकांना शाब्दिक आणि शारीरिक शिवीगाळ करताना ऐकू शकतो. मी जे ऐकले ते कोणत्याही मुलाला ऐकावे लागू नये. किंवा मी जे पाहिले ते पाहायला लागू नये. माझ्या वडिलांना हे माहित नव्हते, पण मी पाहिले की त्यांनी माझ्या आईला इतके जोरात ढकलले की तिच्या ओटी पोटाला लागल्याने तिला दवाखान्यामध्ये न्यावे लागले.
जेव्हा माझे वडील रागावलेले नसत तेव्हा ते दुःखी व नशेत असत. कधी कधी ते घरी यायचे आणि मला बिछान्यातून उठवायचे आणि त्याच्या आयुष्यातील व्यथा सांगायचे आणि अर्थातच, मी लहान होतो, म्हणून मी तिथे बसून माझ्या वडिलांना रडताना पाहत असे. मी सुन्न होत असे. मला आठवते की "याबाबत काय करावे हे मला समजत नव्हते."
मी अशा टप्प्यावर आलो जिथे मला प्रश्न पडला की हे जीवन खरोखर जगण्यास योग्य आहे का, मी माझ्या खिडकीबाहेरच्या मोठ्या झाडाकडे टक लावून पाहात असे आणि स्वत:ला फास लावून घेण्याची योजना करत असे. प्लायवूडच्या पातळ तुकडयातून मी स्वतःच्या थडग्याचा दगड करण्यापर्यंत माझी मजल गेली. काहीवेळा मला आश्चर्य वाटायचे की ते अजूनही त्या माळ्यावर गालीच्याखाली तसेच लपवून ठेवले होते.
मी जे ऐकले ते कोणत्याही मुलाला ऐकावे लागू नये. किंवा मी जे पाहिले ते पाहायला लागू नये.
माझे घराबाहेरचे तिकीट ही माझी मजबूत शैक्षणिक कामगिरी होती ज्यामुळे मला विद्यापीठात जाण्याची परवानगी मिळाली. मी तिथे खरोखर चांगले काम केले आणि डीनच्या यादीत माझे नावही आले. जेव्हा माझ्या वडिलांनी याबद्दल ऐकले तेव्हा त्यांनी मला पहिले आणि शेवटचे सांगितले की त्यांना माझा अभिमान आहे. माझ्या आयुष्यातील घटनांची त्यांनी खरोखरच दोनदा दखल घेतली आहे हे मला फक्त एकदा कळाले.
मी स्वतः व्यसनी झालो नाही, पण दारूचे परिणाम माझ्यासोबत राहिले. अशा या अकार्यक्षम कुटुंबात वाढल्यामुळे, कुटुंब कसे असावे यासाठी माझ्याकडे संदर्भाची चौकट नव्हती. जेव्हा मी स्वत: पती आणि वडील झालो, तेव्हा मी स्वतःला पूर्णपणे परदेशी प्रदेशात शोध घेत असल्यासारखे जाणवले, त्यात सामान्य काय असेल हे शोधण्याचा प्रयत्नही मी केला.
तिथे भावनिक बिघाडही होता. मी माझ्या पालकांना मद्याशिवाय नकारात्मक भावनांचा सामना करताना कधीही पाहिले नाही आणि त्यांनी आम्ही लहान मुले असताना आमच्या भावना कधीच समजल्या नाहीत. आमच्यापैकी कोणीही रडायला लागले तर माझे वडील म्हणायचे, "रडणे थांबवा नाहीतर मी तुम्हाला खरच रडण्यासाठी काहीतरी देईन." मला आठवते की माझ्या विद्यापीठाच्या काळात माझ्या आईला मी मिठी मारली. तेंव्हा ती फळीसारखी तटस्त झाली. तिला प्रेमळपणाचे काय करावे हे कळत नव्हते आणि मी ते तिला कसे द्यायचे हे शिकत होतो.
अनेक वर्षे मी खूप निराशेने जगलो. मी मागे वळून पाहीले की जर माझे पालनपोषण वेगळ्या कुटुंबात झाले असते. तर "गरीब मी" रेकॉर्ड माझ्या पार्श्वभूमीत वाजत राहिला असता: मला अशा प्रकारे का वाढावे लागले?_ मी कल्पना करू इच्छितो की ते जीवन कसे वेगळे असू शकले असते. मी विशेषतः माझ्या वडिलांबद्दलची कटुता आणि राग याला बाजूला केले कारण; ते मला पोखरतच चालले होते.
मला माहित होते की मला क्षमा करायला शिकले पाहिजे अन्यथा हा राग माझ्यावरच नियंत्रण करेल.
विद्यापीठात काही वर्षांनी, कोणीतरी मला सांगितले की मला माझ्या वडिलांना क्षमा करायला पाहिजे आणि त्यांच्यावर प्रीती करण्याचा मार्गही शोधावा लागेल. माझ्या लक्षात आले की माझ्याकडे यासाठी दोन पर्याय आहेत. एकतर मला कडवटपणा आणि रागावणे आणि फाडून टाकणे हे विचार चालू ठेवावे, जे मला माहित होते की ते माझ्या किंवा माझ्या नातेसंबंधांसाठी हितकारक होणार नाही. किंवा मी कसा मोठा झालो याचे चांगले आणि वाईट परिणामांचा स्वीकार करावा, की माझे पालक सदोष असे होते. मला माहित होते की मला क्षमा करायला शिकले पाहिजे अन्यथा हा राग मला पोखरून टाकेल.
शेवटी मी कोणतीही तक्रार किंवा पण न लावता त्याना सांगण्याच्या टप्प्यावर पोहोचलो, की “पप्पा, मी तुम्हावर प्रीती करतो”. त्यामुळे त्यांच्यासोबतचे माझे नाते पुन्हा खुलले. ते अधिक पारदर्शक झाले. एके दिवशी मी माझ्या वडिलांना पत्र लिहिले. मी खरोखर हेतुपुरस्सर होण्याचे निवडले आणि मी त्यांच्याबद्दल विचार करू शकणाऱ्या प्रत्येक चांगल्या गोष्टी लिहिल्या. त्यांनी कधीही त्याला प्रतिसाद दिला नाही, परंतु मला असे वाटले की कदाचित कसे उत्तर लिहायचे त्याना समजले नसावे. पण माझ्या आईने प्रतिसाद दिला. तिने लिहिले, “तुझ्या वडिलांनी तुझे पत्र वाचले आणि मग ते रडले. मला वाटते की त्याना याचीच गरज होती.” माझ्यासाठी तो खरोखर महत्त्वाचा क्षण होता. 1989 मध्ये त्यांचे निधन होण्याअगोदर आमच्या नात्यात त्यामुळे लक्षणीय बदल झाले होते.
तुमचे पालक मद्यपी आहेत का? तुम्ही निराकरण न झालेल्या वेदना/जखमा सोडवण्याच्या प्रयत्न करत आहात का? त्याकरिता तुम्ही एकटे नाहीत. तुम्हाला तुमचा अनुभव सांगायचा असेल तर, आमच्या टीममधील कोणीतरी ते आवेशाने ऐकतील. त्याकरिता कृपया आपली माहिती द्या आणि लवकरच आम्ही तुमच्याशी संपर्क साधू.
गोपनीयतेसाठी लेखकाची आद्याक्षरे वापरली आहेत.
तुम्ही एकटेच प्रवास करण्याची गरज नाही. एखाद्या सल्लागाराशी बोला. हे गोपनीय आणि नेहमी मोफत आहे.
या समस्यांना सामोरे जाणे कठीण होऊ शकते. तुम्ही स्वतःला किंवा इतरांना इजा करण्याचा विचार करत असाल, तर कृपया हे वाचा!
कृपया खाली दिलेल्या फॉर्ममध्ये तुमची माहिती नमूद करा म्हणजे लवकरच आम्ही तुमच्याशी संपर्क करू.अन्यथा सूचित केले नसल्यास, सर्व रखाणे आवश्यक आहेत.