माझ्या भावनांना पायदळी तुडवले
जेव्हा मी पहिल्यांदा माझ्या भावी पतीला भेटले तेव्हा मी फक्त 15 वर्षांची होते, आणि ते 16 वर्षांचे होते. अगदी त्या कोवळ्या वयातही मी एक सशक्त आणि स्वतंत्र विचारांची होते. जीवनात मला काय पाहिजे ते मला माहीत होतं आणि ते मिळवण्यासाठी मी काहीही करायला तयार होते. जीवनात मला ज्या गोष्टी हव्या होत्या त्यांपैकी तो देखील एक होते. मला जरादेखील कल्पना नव्हती की लवकरच माझ्या जीवनात एक वेदनादायक आणि भावनात्मक उलथापालथ होणार आहे.
आमचं लग्न होऊन फक्त काही वर्षं झाली होती; मग, माझे पती इंटरनेटवर त्यांना भेटलेल्या स्त्रियांना लैंगिक अर्थ असलेले ईमेल पाठवत असल्याचं मला कळलं. हे ऐकून मी उद्ध्वस्त झाले आणि मी त्यांना जाब विचारला, पण त्यांनी माझी माफी मागितली आणि मी त्यांच्यावर विश्वास ठेवला की ते पुन्हा असं करणार नाहीत. मग आम्ही जीवनात पुढे गेलो. याच्या दीड वर्षानंतर, मला अगदी माझ्या नाकाखाली त्यांचा एका स्त्रीसोबत असलेल्या प्रेम प्रकरणाबद्दल कळलं. ते एका स्त्रीला शहरात घेऊन आले, त्यांनी तिला एका हॉटेलात ठेवलं, आणि आठवड्याचे शेवटचे दोन दिवस त्यांनी तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले.
या वेळी मी फक्त उद्ध्वस्त झाले नव्हते, तर मला खूप संतापही झाला, आणि मी माझ्या पतीला घराबाहेर हाकलून लावलं. एक आठवड्यानंतर त्यांनी मला फोन केला, आणि ते ढसाढसा रडू लागले. मी त्यांना सांगितलं की आपण चर्चा करू शकतो आणि आम्ही आमच्या वैवाहिक जीवनात पहिल्यांदा सोबत मिळून प्रार्थना केली. आम्ही एका समुपदेशकाचा सल्ला घ्यायला सुरुवात केली आणि जवळजवळ दीड वर्षानंतर सर्वकाही सुरळीत सुरू आहे, असं वाटू लागलं.
पण, माझ्या नकळतपणे, ते आणखी गुप्तपणे हे करू लागले आणि पैसे देऊन वेश्यांशी लैंगिक संबंध ठेवू लागले—त्यांना वाटत होतं की याविषयी, मला कधीही कळणार नाही आणि प्रेमप्रकरणा प्रमाणे कोणतीही स्त्री भावनात्मक रीत्या त्यांच्याशी जोडली जाणार नाही. माझ्या पतीला जडलेल्या लैंगिक गोष्टींचं व्यसन, जे त्यांच्या वयाच्या नवव्या वर्षी पोर्नोग्राफी पाहण्यापासून सुरू झालं होतं, त्याची परिणती अशी झाली.
मी पार उद्ध्वस्त झाले होते. मी सतत तीन दिवस अनियंत्रितपणे थरथर कापत होते.
एकदा मला कळल्यावर, मी विचार केला की मी किती मूर्ख आहे, मला आधीपासून का माहीत झालं नाही, पण त्यासोबतच मी आमचा विवाह संपवण्याचा जो निर्णय घेतला तो योग्यच आहे असं मला वाटलं. मी आमच्या लग्नाची अंगठी बैठक खोलीत एका पत्रासोबत ठेवली; त्यात मी लिहिलं होतं की मी घटस्फोटासाठी अर्ज करत आहे. माझ्या आईनं मला सर्व वस्तू पॅक करण्यासाठी आणि देशाच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या त्या ठिकाणी जाण्यासाठी मदत केली जिथून मी आणि माझे पती इथं फक्त एक महिन्याआधीच आलो होतो. मी पार उद्ध्वस्त झाले होते. मी सतत तीन दिवस अनियंत्रितपणे थरथर कापत होते. आमच्या विवाह बंधनातील या उलथापालथीमुळे मी अशक्त झाले आणि आजारी पडले आणि मी काहीच विचार करू शकत नव्हते किंवा काहीही अनुभव करू शकत नव्हते.
माझ्या पतीला 3,000 मैल दूर मागे सोडून मी आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधू लागले. समस्या ही होती, की सुरुवात कुठून करायची ते मला कळत नव्हतं. माझ्या पतीनं मला दिलेल्या दुःखाचा आणि मानसिक यातनांचा मला त्रास होत असूनही, माझं अजूनही त्यांच्यावर प्रेम होतं. पण, त्यांच्या कृत्यांमुळे मी ठरवलं की मी त्यांच्यासोबत पुन्हा कधीच राहू शकत नाही.
असं नाही की मी परिपूर्ण होते—हे सर्व सुरू झालं तेव्हा माझ्या स्वतःच्या अनेक समस्याही याद्वारे बाहेर आल्या होत्या. पूर्वी, मी नेहमी लोकांची स्वीकृती मिळवण्याद्वारे आणि त्यांचं लक्ष आकर्षित करण्याद्वारे माझी कृत्ये योग्य आहेत याची खात्री करायचे. म्हणून सुरुवातीला त्यांच्या विवाहबाह्य संबंधांना मी वैयक्तिक रीत्या खूप मनावर घेतलं. मला वाटलं की एक पत्नी या नात्यानं माझ्याप्रती त्यांचं आकर्षण मी टिकवून ठेवू शकले नाही. भविष्यात इतर कोणासोबतही असं होणार नाही हे कशावरून?
लैंगिक गोष्टींच्या व्यसनाच्या विळख्यात सापडल्यामुळे, ते जी काही विनाशक निवड करत होते त्यामुळे ते आणखी जास्त विनाशाच्या गर्तेत जात होते.
घटस्फोटाची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात असताना, आम्ही पुन्हा एकदा फोनद्वारे आणि ईमेलद्वारे एकमेकांशी बोलू लागलो. आम्ही आपल्या भावना मोकळेपणानं एकमेकांना सांगितल्या आणि आमच्या विवाहात कोणत्या गोष्टी चुकीच्या घडल्या ते शोधण्याचा प्रयत्न केला. हे खरं आहे की माझ्या पतीला लैंगिक गोष्टींसाठीचं व्यसन मी त्यांच्या जीवनात येण्याआधीपासूनच लागलं होतं. लैंगिक गोष्टींच्या व्यसनाच्या विळख्यात सापडल्यामुळे, ते जी काही विनाशक निवड करत होते त्यामुळे ते आणखी जास्त विनाशाच्या गर्तेत जात होते. ते बदल करायला तयार होते. पण, त्यांना माहीतच नव्हतं की कसं बदल करायचं. मलाही माहीत नव्हतं. माझं मन खूप दुःखावलेलं होतं. मला इतकीच आशा होती की जीवनात पुढे जायचं आणि भविष्यात इतरांसोबतच्या नातेसंबंधात पुन्हा त्याच चुका नाही करायच्या. पण, एकमेकांना अशा प्रकारे आमच्या मनात काय आहे ते स्पष्टपणे सांगितल्यामुळे, आम्ही पुन्हा एकदा जवळ येऊ लागलो आणि आमच्या काही जखमा भरून काढण्याचा आणि समस्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न केला.
सहा महिने एकमेकांपासून विभक्त राहिल्यानंतर, आम्ही दोघांनी पुन्हा समेट केला. माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. आमच्या समस्या रातोरात मिटल्या नाहीत. आमचं विवाहबंधन सुंदर बनवण्यासाठी एका दशकापेक्षा जास्त काळ लागला आहे. असं करणं मुळीच सोपं नव्हतं, पण आता आमचा विवाह कोणत्याही अडथळ्यांविना जणूकाही गुळगुळीत रुळावरून अगदी सुरळीत चाललं आहे.
या अनुभवामुळे मी पूर्णपणे खचून गेले होते. यामुळे मला याची जाणीव झाली की मी माझ्या पतीला “सुधारू” शकत नाही. पण, माझ्या स्वतःच्या समस्यांवर काम करण्याद्वारे आणि माझी मनोवृत्ती सुधारण्याद्वारे मी त्यांना मदत करू शकले. माझ्या एकटीमुळे ही समस्या उद्भवली नाही हे जरी खरं असलं (आणि त्यांच्या निवडींसाठी ते एकटेच जबाबदार होते), तरी या समस्येच्या समाधानाचा भाग बनण्याची निवड मी करू शकले.
विवाह साथीदाराच्या विश्वासघाताचा सामना करणं हा खरोखरच एक कठीण आणि वेदनादायक प्रवास आहे. हा प्रवास तुम्ही एकट्यानं करण्याची गरज नाही. जगात माझ्यासारखे लोक आहेत ज्यांना अशा प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागला आणि ज्यांना याविषयी चांगली माहिती आहे. तुमचा विवाह साथीदार बदल करायला तयार असो किंवा नसो, या समस्येचा चांगल्या प्रकारे सामना करण्यासाठी आणि वेदनांचा आणि नकाराचा सामना करण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. जर तुम्ही खाली दिलेल्या फॉर्ममध्ये तुमची माहिती नमूद केली, तर आमचा एखादा सल्लागार लवकरच तुम्हाला प्रतिसाद देईल. तुमचं संभाषण गोपनीय ठेवण्यात येईल आणि या सेवेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
तुम्ही एकटेच प्रवास करण्याची गरज नाही. एखाद्या सल्लागाराशी बोला. हे गोपनीय आणि नेहमी मोफत आहे.
या समस्यांना सामोरे जाणे कठीण होऊ शकते. तुम्ही स्वतःला किंवा इतरांना इजा करण्याचा विचार करत असाल, तर कृपया हे वाचा!
कृपया खाली दिलेल्या फॉर्ममध्ये तुमची माहिती नमूद करा म्हणजे लवकरच आम्ही तुमच्याशी संपर्क करू.अन्यथा सूचित केले नसल्यास, सर्व रखाणे आवश्यक आहेत.