माझं आजारपणामधून

मी लोकांना असं म्हणताना ऐकलं होतं की, “आजारपणामुळं एका व्यक्तीचं संपूर्ण आयुष्यच बदलून जातं.” जेव्हा मला लसिका ग्रंथीचा असंसर्गजन्य क्षयरोग, इतरत्र न पसरणारा टीबी होऊन मी अशक्त बनले आणि त्यामुळे माझं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं, तेव्हा ते मी स्वतः अनुभवलं.

वर्ष 2005 मध्ये, मी गर्भवती असल्याचं अहवाल सकारात्मक आला तेव्हा माझ्या आनंदाला पारावार उरला नव्हता. ही बातमी ऐकून घरी सर्व जण किती उत्साही होते! पण, मला माझ्या जबड्याच्या खाली एक छोटीशी गाठ दिसून आली, तेव्हा माझ्या आनंदाचे हे दिवस अचानक दुःखामध्ये रूपांतरित झाले. ही गाठ टिबीची असण्याची शंका डॉक्टरनं वर्तवली आणि म्हटलं की ते माझ्यावर टीबीचा औषधोपचार सुरू करू शकत नाहीत, कारण तीव्र औषधं माझ्या गर्भात वाढणाऱ्या बाळाला नुकसान पोहचवू शकतात. हे ऐकून माझ्यावर जणू आभाळच कोसळलं! चाचण्यांनंतर जेव्हा खात्री पटली की ही टीबीचीच गाठ आहे, तेव्हा सौम्य प्रकारच्या औषधांनी माझ्यावर उपचार सुरू करण्यात आला आणि माझी मुलगी जन्माला येईपर्यंत गाठ हळूहळू नाहीशी झाली.

तीव्र औषधं माझ्या गर्भात वाढणाऱ्या बाळाला नुकसान पोहचवू शकतात.

मला वाटलं की मी बरी झाली आहे, पण लवकरच टीबीची गाठ परत वाढू लागली आणि पुन्हा माझ्यावर औषधोपचार सुरू करण्यात आला. त्या वेळी, गाठ दिसणं किंवा न दिसणं हेच फक्त माझ्या आजाराचं बाहेरून दिसणारं लक्षण होतं. पण, काही महिने आजार नियंत्रणात राहिल्यानंतर, माझ्या लक्षात आलं की गाठ पुन्हा वाढत आहे आणि दिवसेंदिवस मोठी होत आहे. या वेळी मी टीबीच्या तज्ज्ञ डॉक्टरचा सल्ला घ्यायचं ठरवलं, कारण मला काळजी वाटत होती की मागील एक वर्षापेक्षा जास्त काळापासून तीव्र आणि महाग औषधांद्वारे उपचार सुरू असूनही मी पूर्णपणे बरी होत नव्हते.

लसीका ग्रंथीचा टीबी असंसर्गजन्य आहे असं मानलं जात असलं, तरीही मला माझ्या मुलीची चिंता वाटायची, कारण ती फक्त एक वर्षाची होती, आणि कुटुंबातील इतर लोकांचीही मला काळजी वाटत होती. त्यांनादेखील हा आजार होईल की काय याची मला भीती वाटत होती.

आता लगेच 2010 मध्ये येऊ या—आजाराला सुरुवात होऊन पाच वर्षं लोटूनही मी अजूनही आजारातून बरी झाले नव्हते. माझी अवस्था दयनीय झाली होती! टीबीच्या उपचारात तज्ज्ञ असलेल्या एका चांगल्या डॉक्टरचा सल्ला घ्यायला मी सुरुवात केली. त्यांना वाटलं की माझा आजार औषधांचा प्रतिकार करणारा आजार आहे आणि त्यामुळे संसर्गाशी लढण्यासाठी त्यांनी मला अतिशय महाग औषधांचा आणि इंजेक्शनांचा एकत्रित उपचार सुरू केला. आतापर्यंत माझी गाठ गोल्फच्या चेंडूइतकी मोठी झाली होती. म्हणून, त्यांनी मला गाठ काढून टाकण्यासाठी एक छोटीशी शस्त्रक्रिया करण्याचाही सल्ला दिला. असं केल्यानं, आजाराचा प्रभाव कमी होणार होता, आणि उपचार परिणामकारक ठरणार होते.

आजाराला सुरुवात होऊन पाच वर्षं लोटूनही मी अजूनही आजारातून बरी झाले नव्हते.

माझ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, पण माझ्या दुर्बल शरीरासाठी औषधं खूप तीव्र होती. ऑफिसला जाणंदेखील खूप कठीण झालं होतं; मळमळ होणं, हातपाय थरथर कापणं, भूख न लागणं यासारखे त्रास मला होऊ लागले. शिवाय, माझे सुंदर केस, जे मला अतिशय प्रिय होते, झडू लागले. अशा प्रकारे, औषधांचा दुष्परिणाम जाणवू लागला होता! काम करण्याचा दबाव, मुलीची देखभाल, आणि घरातील कामं करणं इतकं आव्हानात्मक बनत चाललं होतं की मागील एका दशकापासून जास्त काळापासून मी करत असलेली माझी आवडती नोकरी सोडण्याचाही मी निर्णय घेतला होता.

मी माझ्या परिस्थितीविषयी माझ्या पर्यवेक्षकाशी चर्चा केली; आजारातून बरी होण्यासाठी मी त्यांना फक्त “काही महिन्यांसाठी कामावर अनुपस्थित राहण्याची रजा” मागितली, पण त्यांनी “काही महिन्यांची पगारासह वैद्यकीय रजा” मंजूर केली.

या कालावधीमुळे मला या आजारातून बरे होण्यास मदत मिळाली.

एखाद्या जुनाट आजारामुळे जर तुम्हालाही अशाच खडतर परिस्थितीतून जावं लागत असेल, तर लक्षात ठेवा की तुम्ही एकटे नाही. अशा कठीण परिस्थितीतून आपल्याला का जावं लागतं हे नेहमीच आपल्याला कळत नाही. ही वेळ भावनात्मक रीत्या आणि शारीरिक रीत्या अत्यंत दुर्बल करणारी असते. जर तुम्हीही एखाद्या आजाराचा सामना करत असाल, तर कृपया त्याविषयी बोलण्यासाठी आमच्या एखाद्या सल्लागाराला लिहायला मुळीच संकोच करू नका. सर्व संभाषणे पूर्णपणे गोपनीय आहेत.

छायाचित्र सौजन्याने Annie Spratt

तुम्ही एकटेच प्रवास करण्याची गरज नाही. एखाद्या सल्लागाराशी बोला. हे गोपनीय आणि नेहमी मोफत आहे.

या समस्यांना सामोरे जाणे कठीण होऊ शकते. तुम्ही स्वतःला किंवा इतरांना इजा करण्याचा विचार करत असाल, तर कृपया हे वाचा!

कृपया खाली दिलेल्या फॉर्ममध्ये तुमची माहिती नमूद करा म्हणजे लवकरच आम्ही तुमच्याशी संपर्क करू.अन्यथा सूचित केले नसल्यास, सर्व रखाणे आवश्यक आहेत.

तुमचा लिंग::
वय श्रेणी (आवश्यक)::

तुमच्यासाठी एक योग्य सल्लागार नेमण्यासाठी आम्ही लिंग आणि वय विचारतो सेवेच्या अटी & गोपनीयता धोरण .