दुःखात समाधान मिळत नाही

मी 13 वर्षाचा असताना एकदा आम्ही शाळेच्या सहलीला गेलो होतो तेव्हा पहिल्यांदा मी पोर्न (अश्लील चित्रे आणि व्हिडिओ) पाहिलं होतं. सहलीच्या पहिल्या रात्री जेव्हा आम्ही सर्व जण आपापल्या खोल्यांमध्ये गेलो तेव्हा माझ्या एका मित्रानं त्याच्या सूटकेसमधून पोर्न असलेली कितीतरी मासिकं बाहेर काढल्याचं पाहून मला धक्काच बसला (त्या काळात इंटरनेट वगैरे नव्हते). त्यानं मला सांगितलं की त्याच्या आईवडिलांना याविषयी माहीत आहे आणि ते म्हणतात की आज ना उद्या याविषयी त्याला शिकावंच लागणार आहे. अर्थातच, मासिकांतील चित्रे पहाहुन मी अर्थातच अत्यंत मोहित झालो होतो, आणि त्या पुढच्या काही दिवसांत मी पाहिलेल्या प्रतिमा माझ्या मेंदूत कोरल्या गेल्या.

यानंतर काही काळानं, आमच्या भागातील एका केबल टीव्ही चॅनलनं दर शुक्रवार-शनिवारच्या मध्यरात्री तुलनेनं कमी अश्लील असणारे चित्रपट दाखवायला सुरुवात केली. मला लवकर झोपायचं आहे असं नाटक करून मी बेडरूममध्ये जायचो आणि मग हळूच टीव्ही असलेल्या खोलीत जाऊन अगदी सकाळ होईपर्यंत ते चित्रपट पाहत बसायचो. मी त्या वेळी किशोरावस्थेत होतो. दर शुक्रवार-शनिवारच्या रात्री अश्लील चित्रपटे पाहण्याचा हा प्रकार कितीतरी वर्ष सुरू राहिला. माझ्या मनावर अश्लील चित्रे आणि व्हिडिओतील दृश्ये मोठ्या प्रमाणात कोरली गेली. किशोरावस्थेच्या सुरुवातीच्या काळात एक वेळ अशी आली होती की रोज रात्री हस्तमैथुन केल्याशिवाय मला झोपच यायची नाही, आणि कितीतरी वर्षांपर्यंत माझी ही वाईट सवय तशीच राहिली. हस्तमैथुन केल्यानंतर मला प्रत्येक वेळी अतिशय वाईट वाटायचं आणि मी असंख्य वेळा देवाला आणि स्वतःला वचन दिलं की मी आता पुन्हा कधीच असं करणार नाही. पण, असं करायचं थांबवण्याची इच्छाशक्ती माझ्यामध्ये नव्हती, आणि म्हणून माझी ही वाईट सवय सुटली नाही.

याबद्दल लोकांना जर कळलं तर ते काय विचार करतील या विचारानं मी अत्यंत घाबरून जायचो.

मी विशीत पदार्पण केत त्या वेळी सगळीकडे इंटरनेट उपलब्ध होऊ लागलं होतं, आणि या नवीन तंत्रज्ञानामुळे आपण कल्पनाही करू शकत नाही अशा प्रकारची पोर्नोग्राफी बोटांच्या इशाऱ्यावर लगेच उपलब्ध होऊ लागली. आता मी माझ्या संगणकाच्या स्क्रीनवर नवनवीन आणि वेगवेगळ्या प्रकारची अश्लील चित्रे आणि व्हिडिओ पाहू लागलो. ही वाईट सवय मी लगेच आणि नेहमीसाठी सोडून दिली पाहिजे असं मी स्वतःला वचन द्यायचो, पण मी तसं करू शकलो नाही. मी या इच्छेचा प्रतिकारच करू शकत नव्हतो. पोर्न पाहण्याचं, हस्तमैथुन करण्याचं, त्यामुळे स्वतःला दोषी वाटण्याचं आणि पुन्हा कधीही असं करणार नाही हे वचन देण्याचं चक्र कधी थांबेलही की नाही याचा मी विचार करत राहायचो. बाहेरून पाहिलं तर मी एक चांगला माणूस होतो, आणि मी ज्या धार्मिक समूहाचा भाग होतो त्यात मी चांगली प्रगती करत होतो आणि लवकरच एक पुढारी म्हणून वर येणार होतो. पण आतून पाहिल्यास मी दररोज मोठी गोष्ट लपवण्याचा प्रयत्न करत होतो, आणि याबद्दल लोकांना जर कळलं तर ते काय विचार करतील या विचारानं मी अत्यंत घाबरून जायचो. मी विचार केला की एकदा का माझं लग्न झालं की ही समस्या कायमची सुटेल, पण लग्नानंतरही पोर्नोग्राफी पाहण्याची आणि हस्तमैथुन करण्याची माझी ही वाईट सवय काही सुटली नाही.

या वाईट सवयीविरुद्ध माझ्या संघर्षात कदाचित मी पहिल्यांदा तेव्हा विजयी झालो जेव्हा मला समजलं की माझ्या वाईट सवयीचं मूळ लैंगिक संबंधांबद्दल विचार करण्यात, किंवा स्त्रियांच्या सौंदर्यात, किंवा जीवशास्त्रात नाही. खरंतर, मी एका सुंदर स्त्रीला पाहून स्वतःवर नियंत्रण करूच शकत नाही अशातली गोष्ट नव्हतीच तर माझी वाईट सवय माझ्याशी संबंधित होती. इतरांची स्वीकृती, प्रशंसा, प्रेम आणि अधिकार मिळवण्याच्या माझ्या इच्छेशी संबंधित होती. वासना आणि पोर्नोग्राफीनं मला आपल्या विळख्यात घेण्याचं खरं कारण म्हणजे जरी हे जग मी कोण आहे, किती महान आहे हे ओळखत नसलं, तरी कमीत कमी माझ्या कल्पनारम्य सुंदर स्त्रिया तरी माझ्यावर प्रेम करायच्या आणि मी त्यांना हवाहवासा वाटायचो.या वाईट सवयीपासून जर मला मुक्‍त व्हायचं असेल, तर आधी मला माझ्या मनावर ताबा मिळवलेल्या पोर्नपासून सुटका मिळवणं गरजेचं होतं. पोर्नच्या गुलामगिरीतून पूर्णपणे मुक्त्त होण्यासाठी मला पोर्नच्या खोट्या आशवासनांविरुद्ध सत्याच्या मदतीनं जाणीवपूर्वक लढा देणं गरजेचं होतं.

माझ्यावरील माझ्या पत्नीच्या प्रेमामुळे मला अगदी पूर्णपणे ही वाईट सवय नेहमीसाठी सोडून देण्याची प्रेरणा मिळाली.

पोर्न पाहण्याच्या माझ्या वाईट सवयीवर मात करण्यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझे चांगले मित्र. माझे असे काही मित्र होते ज्यांच्यावर मी भरवसा करू शकत होतो, ज्यांना माझ्या मनातील सर्व गोष्टी मी सांगू शकत होतो, आणि हजारो वेळा ती वाईट गोष्ट केल्यानंतरही जे माझ्यासाठी प्रार्थना करायचे. जेव्हा मी गतकाळातील आणि सध्याच्या पोर्नविरुद्ध माझ्या संघर्षाविषयी माझ्या सर्वात चांगल्या मित्राला, म्हणजे माझ्या पत्नीला सांगितलं तेव्हा वासना आणि पोर्नोग्राफीवर मी पूर्णपणे विजय मिळवू शकलो. परत कधी मी या वाईट सवयीला बळी पडलो तर त्याबद्दल तिला सांगण्याचं वचन मी तिला दिलं. मला वाटलं की हे ऐकून तिला धक्का बसेल आणि माझा राग येईल, पण तिच्यासमोर मी माझी वाईट सवय कबूल केल्यामुळे जरी तिला दुःख झालं असलं, तरी तिनं मला वचन दिलं की ती मला आधार देईल आणि माझ्यासाठी प्रार्थना करत राहील. मी ज्या वेळी माझ्या पत्नीजवळ कबूल केलं होते जवळजवळ त्या वेळपर्यंत पोर्नच्या विळख्यातून मी बऱ्यापैकी मुक्त्त झालो होतो, आणि माझ्यावरील माझ्या पत्नीच्या प्रेमामुळे मला अगदी पूर्णपणे ही वाईट सवय नेहमीसाठी सोडून देण्याची प्रेरणा मिळाली. आता मला यापुढे लपवण्याची गरज नव्हती, आणि पुढे माझ्या पत्नीसोबत अशा प्रकारे विश्वासघात करण्याची माझी मुळीच इच्छा नव्हती (विचारांतही नाही).

कितीतरी दशकांपर्यंत पोर्नविरुद्ध संघर्ष केल्यानंतर, मला आनंद होतो की आज मी पोर्नोंग्राफीपासून पूर्णपणे मुक्त्त झालो आहे. मला याची पूर्णपणे खात्री पटली आहे, की पोर्न फक्त्त सुखाचे स्वप्न दाखवते पण देते फक्त दुःखच. पण या सवयीपासून रातोरात माझी सुटका झाली नाही, तर १०-वर्षापेक्षा जास्त काळादरम्यान हळूहळू अनेक प्रक्रियांतून गेल्यानंतर हे शक्य झालं.

माझा हा संघर्ष आता संपला आहे आणि मी स्वातंत्र्य आणि आनंद अनुभवत आहे. तुम्हीदेखील स्वातंत्र्याच्या दिशेनं वाटचाल सुरू करावी म्हणून मी तुम्हाला आमंत्रण देत आहे. तुम्ही एकट्यानेच हा संघर्ष करत राहण्याची गरज नाही. गोपनियता बाळगून आणि मोफत तुमचं म्हणणं ऐकून घेणारे आणि तुम्हाला आधार देणारे सल्लागार आमच्याकडे आहेत. जर तुम्ही खाली दिलेल्या फॉर्ममध्ये तुमची माहिती नमूद कराल, तर आमच्यापैकी कोणीतरी लवकरच तुमच्याशी संपर्क करेल

गोपनीयतेच्या कारणामुळे लेखकाचे नाव बदलण्यात आले आहे.

तुम्ही एकटेच प्रवास करण्याची गरज नाही. एखाद्या सल्लागाराशी बोला. हे गोपनीय आणि नेहमी मोफत आहे.

या समस्यांना सामोरे जाणे कठीण होऊ शकते. तुम्ही स्वतःला किंवा इतरांना इजा करण्याचा विचार करत असाल, तर कृपया हे वाचा!

कृपया खाली दिलेल्या फॉर्ममध्ये तुमची माहिती नमूद करा म्हणजे लवकरच आम्ही तुमच्याशी संपर्क करू.अन्यथा सूचित केले नसल्यास, सर्व रखाणे आवश्यक आहेत.

तुमचा लिंग::
वय श्रेणी (आवश्यक)::

तुमच्यासाठी एक योग्य सल्लागार नेमण्यासाठी आम्ही लिंग आणि वय विचारतो सेवेच्या अटी & गोपनीयता धोरण .