माझ्यामध्येच काहीतरी दोष असेल का?

आम्ही खूप आनंदी होतो—मी गर्भवती असल्याचं तपासणीत निदाण झालं होतं आणि सर्वकाही अगदी छान होतं. एक सुंदर छोटंसं कुटुंब, एक छान इवलासा हृदयाचा ठोका, एक सुंदर भविष्य. माझ्या गर्भात एक छोटासा जीव वाढत आहे याचा कोणताच पुरावा माझ्या पोटावरून दिसत नव्हता, पण माझ्या चेहऱ्यावरील तेज आणि आनंदी हृदयामुळे ते कोणापासूनच लपलं नव्हतं. सर्वकाही परिपूर्ण आहे असं वाटत होतं—आशा आणि आनंदानं भरपूर.

पण, गोष्टी कशा एका क्षणात बदलू शकतात हे ऐकणं खरोखरच विचित्र आहे. मी नेहमीप्रमाणे वॉशरूमला गेले, मला रक्ताचे काही थेंब दिसले. अल्ट्रासाऊंड करण्यात आलं, पण त्यात बाळाच्या हृदयाचे ठोके जाणवत नव्हते. मी किती अपेक्षेनं होते की मला माझ्या गर्भात इवल्याशा हातापायांच्या हालचाली अनुभवायला मिळतील, पण त्याऐवजी सर्वकाही एकदम थांबलं. आमचा हृदय भंग पावला. बाळ होणार ही आशा न उरल्यामुळे, आमच्या मनात अनिश्चितता आणि रिक्तपणा निर्माण झाल्या.

ज्या छोट्या बाळाची मी आशा केली होती आणि ज्याच्यासाठी मी प्रार्थना केली होती ते बाळ आता माझ्या गर्भात वाढत नव्हतं हे आता स्पष्ट झालं होतं. मला ज्या धोक्याचा इशारा देण्यात आला होता त्यापेक्षाही मोठा आघात मला सहन करावा लागणार होता. गर्भातच मरण पावलेल्या माझ्या बाळाला जन्म देण्याच्या अतिशय कठीण आणि हादरवून टाकणाऱ्या अनुभवातून मला जावं लागणार होतं. तिथल्या स्वास्थ्य कर्मचाऱ्यांच्या (“रडू नकोस, त्यात रडायचं काय आहे”) आणि मित्रमैत्रिणी आणि कुटुंबातील सदस्यांच्या असंवेदनशील टिप्पण्यांची (“धीर धर, तुला काही झालं नाही, जीवनात पुढे जायचं आहे, तू पुन्हा एकदा प्रयत्न करू शकते, ते खरंतर अजून बाळ बनलंच नव्हतं”) माझ्या दुःखात मला अजिबात मदत झाली नव्हती.

एक स्त्री आणि एक पत्नी या नात्यानं मी अपयशी ठरले असं मला वाटलं. मला खात्री आहे, की इतरजणही मला त्याच दृष्टीने पाहत असावेत.

दुसऱ्यांनी आणि मी स्वतःदेखील नकळतपणे माझ्यावर दोषभावनेचं जे ओझं लादलं होतं त्याच्यामुळेदेखील मला काहीच मदत मिळाली नाही. माझ्या मनात कितीतरी प्रश्न निर्माण झाले. माझ्यामध्येच काहीतरी दोष असेल का? भविष्यात मला कधीच बाळ नाही झालं तर?

मला फक्त बाळ गमावल्याचं दुःख होत नव्हतं, तर भविष्याबद्दल अनिश्चिततेचं दुःखही मला सतावत होतं. एक स्त्री आणि एक पत्नी या नात्यानं मी अपयशी ठरले असं मला वाटलं. मला खात्री आहे, की इतरजणही मला त्याच दृष्टीने पाहत असावेत. माझ्या जीवनातील आतापर्यंतच्या सर्व शारीरिक आणि भावनिक दुःखांपेक्षा बाळ गमावल्याचं दुःख अतिशय वेदनादायक होतं. दोषभावना, एकाकीपणा, अनिश्चितता, अपयश, आणि दुःख या गोष्टींनी मला ग्रासलं होतं.

आशा आणि आनंद पुन्हा प्राप्त करण्यासाठी बराच वेळ लागला, पण दुःखातून सावरण्याच्या प्रवासात मला काही गोष्टींमुळे मदत मिळाली. मला जाणीव झाली की दुःख व्यक्त करणं आणि माझ्या बाळाच्या आठवणी जोपासणं—म्हणजे नुकसानीकडे दुर्लक्ष न करणं आणि त्या आठवणी बाजूला न सारणं माझ्यासाठी चागलं आहे. नुकसानीबद्दल बोलणंदेखील एक आशीर्वाद ठरू शकतं या जाणीवेमुळेदेखील मला मदत मिळाली, आणि त्यामुळे दुःखद अनुभवातून जाणाऱ्या माझ्यासारख्या इतर जणांना शोधण्याची मला प्रेरणा मिळाली. या सर्वांपेक्षा मोठी मदत मला तेव्हा मिळाली जेव्हा मला याची जाणीव झाली, की मी जीवनात रिक्तपणा आणि अनिश्चितता अनुभवत असूनही, देव माझ्या मनाचे घाव भरू शकतो आणि मला एक नवीन आशा देऊ शकतो.

जर तुमचाही गर्भपात झाला असेल, तर या दुःखद अनुभावातून तुम्ही एकट्यानेच प्रवास करण्याची गरज नाही. तुमचं दुःख कोणीतरी ऐकून घ्यावं आणि दुःखाचा निरोगी मार्गांनी सामना करण्यासाठी आणि भविष्यात एक आशा मिळवण्यासाठी तुम्हाला मदत मिळावी असे जर तुम्हाला वाटत असेल, तर खाली दिलेल्या फॉर्ममध्ये तुमची माहिती नमूद करा, आणि एक मोफत आणि गोपनीय सल्लागार लवकरच तुमच्याशी संपर्क करेल. तुम्ही स्वतःच्या खऱ्या किंवा खोट्या नावाने माहिती देऊ शकता. ते पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे.

गोपनीयतेच्या कारणांमुळे लेखकाचे नाव बदलण्यात आले आहे.
छायाचित्र सौजन्याने George Ruiz

तुम्ही एकटेच प्रवास करण्याची गरज नाही. एखाद्या सल्लागाराशी बोला. हे गोपनीय आणि नेहमी मोफत आहे.

या समस्यांना सामोरे जाणे कठीण होऊ शकते. तुम्ही स्वतःला किंवा इतरांना इजा करण्याचा विचार करत असाल, तर कृपया हे वाचा!

कृपया खाली दिलेल्या फॉर्ममध्ये तुमची माहिती नमूद करा म्हणजे लवकरच आम्ही तुमच्याशी संपर्क करू.अन्यथा सूचित केले नसल्यास, सर्व रखाणे आवश्यक आहेत.

तुमचा लिंग::
वय श्रेणी (आवश्यक)::

तुमच्यासाठी एक योग्य सल्लागार नेमण्यासाठी आम्ही लिंग आणि वय विचारतो सेवेच्या अटी & गोपनीयता धोरण .