मी आपली नोकरी आणि आत्मविश्‍वास गमावला

मी मागील -वर्षामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम केलं आहे. या दोन दशकांत, मी कंपन्या बदलल्या. काही कंपन्यांनी मला कामावरून कमी केलं होतं, तर काही कंपन्यांमधील काम मी स्वतः सोडलं होतं. आता वयाच्या चाळीशीत पदार्पण केल्यानंतर, मी जीवनात स्थैर्याची आणि एका दीर्घकालीन नोकरीची अपेक्षा करत होतो.

माझ्या एका जुन्या कंपनीनं मला परत कामावर बोलावल, तेव्हा मी लगेच हो म्हटलं त्या कंपनीला भांडवल मिळालं होतं आणि त्यांनी आता कंपनीचं ऑफिस एका नवीन इमारतीत हलवलं होतं. मी आधी या कपंनीत ९ वर्ष काम केलं होतं त्याच्या तुलनेत हे ऑफिस खूप मोठं होतं. म्हणून मला वाटत होतं, की सर्वकाही ठीक चाललं आहे.

कंपनीजवळ पैसा होता आणि कंपनीसमोर एक दीर्घकालीन ध्येय होतं. तिथं मी माझ्या काही जुन्या सहकाऱ्यांना आणि वरिष्ठांनादेखील भेटलो. असं वाटत होतं की अगदी माझी अतृप्त इच्छा पूर्ण होत आहे. मी आधी ज्यांच्योसोबत काम केलं होतं त्या ओळखीच्या लोकांसोबत आणि ओळखीच्या वातावरणात काम करणं खरोखर आनंददायक होतं.

माझं स्वप्न पूर्ण होत आहे, असं वाटत होतं.

मी कामावर रुजू झालो आणि मला एका ओळखीच्या संघामध्ये नेमण्यात आलं. मी आधी कंपनीत असताना ज्यांनी वेगवगळ्या संघांसोबत काम केलं होतं त्या मोजक्या लोकांना वगळता या संघातील बहुतेक लोक नवीन होते. हे सर्व खरंच खूप छान होतं. माझं स्वप्न पूर्ण होत आहे असं वाटत होतं. मला लवकरच काम समजू लागलं; मी अपेक्षा केली नव्हती तितक्या लवकर मी कामातील नवीन गोष्टी शिकून घेतल्या. माझ्या या नोकरीला आता काही धोका नाही असं मला वाटू लागलं होतं, कारण मार्केटिंगच्या कामावर कंपनी भरघोस पैसा खर्च करत होती आणि बाहेरून असं वाटत होतं की कंपनीला काही धोका नाही, कंपनी अगदी स्थिर आहे.

कामावर रुजू होऊन सहा महिने झाल्यावर हळूहळू काही गोष्टी उलगडू लागल्या. कंपनीच्या मालकानं आपल्या मुलाला एका वरिष्ठ पदावर नेमलं. या जबाबदारीसाठी आवश्यक असलेलं अनुभव मालकाच्या मुलाजवळ नव्हता. कंपनीतील निर्णय प्रक्रिया ढासळू लागली. कंपनीकडील पैसा संपू लागला. मग, आम्हाला पगार मिळण्यात उशीर होऊ लागला.

या कामावर रुजू होऊन जेमतेम एक वर्षात, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी (सीईओ) एका कार्यक्रमात एक अशी घोषणा केली, ज्यामुळे माझ्या मनाची धाकधूक वाढली.

या कामावर रुजू होऊन जेमतेम एक वर्षात, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी (सीईओ) एका कार्यक्रमात एक अशी घोषणा केली, ज्यामुळे माझ्या मनाची धाकधूक वाढली. व्यवसायात टिकून राहण्यासाठी कंपनीला काही कर्मचाऱ्यांना कामावरून काठून टाकण्याची गरज भासू लागली होती. मला स्वतःची आणि माझ्या संघाची थोडी चिंता वाटू लागली. मी आशा करत होतो की कंपनीनं मला परत कामावर बोलावलं असल्यामुळे, आणि माझा संघही लहान असल्यामुळे आम्हाला कामावरून काठून टाकलं जाणार नाही. याचं कारण म्हणजे कपातीची घोषणा करण्याच्या काही दिवसांआधीच सीईओ यांनी मला त्यांच्या आफिसमध्ये बोलावलं होतं आणि मला विचारलं होतं की आम्ही काय करू शकतो ज्यामुळे आमचा विभाग आणखी बळकट होईल आणि संघात उत्साह निर्माण होईल.

एक दिवस मला मानवी संसाधने विभागाच्या प्रमुखाला भेटायला सांगण्यात आलं. निःसंकोचपणे आणि आत्मविश्वासाने मी लगेच त्यांना भेटायला त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो. त्या भेटीची सुरुवात छान झाली, पण पुढे ते म्हणाले की मला आता कामावर येण्याची गरज नाही. हे ऐकून मी पूर्णपणे हादरून गेलो होतो आणि माझा माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. मी विभाग प्रमुखाला म्हटलं की दोन दिवसांपूर्वीच मी सीईओला भेटलो होतो आणि आमच्या विभागाला बळकट कसं करता येईल आणि संघामध्ये कशा प्रकारे उत्साह निर्माण करता येईल याबद्दल आम्ही चर्चा केली होती. मग, या तासांमध्ये असं काय घडलं? या प्रश्नाचं पटण्याजोगं आणि तर्कसंगत उत्तर मला मिळालं नाही.

मी लगेच त्या ऑफिसमधून बाहेर पडलो आणि माझ्या संघाला ताबडतोब ही बातमी कळवली हे ऐकून माझ्याप्रमाणेच त्यांनादेखील जबरदस्त धक्का बसला. मी लगेच घरी गेलो. “हे काय घडलं?” आणि “असं का घडलं?” असे असंख्य विचार माझ्या मनात येत होते. मला विश्वासच बसत नव्हता. आता मी माझ्या कुटुंबाला काय सांगू? मला अपमानित वाटू लागलं; क्रूरपणे विश्वासघात करण्यात आला होता.

नोकरी जाऊन एक वर्ष होत आहे, पण अजूनही मला त्या गोष्टीचा राग येतो, दुःख. आणि अपमान झाल्यासारखं वाटतं. नोकरीचा शोध अजूनही सुरूच आहे, पण विश्वासघाताचे जे परिणाम झाले ते भयंकर होते. म्हणतात ना की काळासोबत सर्व जखमा बऱ्या होतात. मी नक्कीच त्या दिवसाची आतुरतेनं वाट पाहत आहे. सध्या माझ्याकडे नोकरी नाही, पण मी अजूनही आशा सोडलेली नाही.

जर तुम्हालाही अशाच प्रकारे संघर्ष करावा लागत असेल, तर आठवणीत ठेवा की तुम्ही एकटे नाही. कृपया तुमच्या संघर्षाविषयी आमच्या एखाद्या सल्लागाराला लिहायला संकोच करू नका. हे अगदी मोफत आणि गोपनीय आहे. जर तुम्ही तुमच्या संपर्काची माहिती खाली नमूद कराल, तर लवकरच एखादा सल्लागार तुमच्याशी संपर्क करेल. तुम्ही स्वतःच्या खऱ्या किंवा खोट्या नावाने माहिती देऊ शकता. ते तुमच्यावर अवलंबून आहे.

गोपनीयतेच्या कारणांमुळे लेखकाचे नाव बदलण्यात आले आहे
छायाचित्र सौजन्याने Venkadesh Subramanian

तुम्ही एकटेच प्रवास करण्याची गरज नाही. एखाद्या सल्लागाराशी बोला. हे गोपनीय आणि नेहमी मोफत आहे.

या समस्यांना सामोरे जाणे कठीण होऊ शकते. तुम्ही स्वतःला किंवा इतरांना इजा करण्याचा विचार करत असाल, तर कृपया हे वाचा!

कृपया खाली दिलेल्या फॉर्ममध्ये तुमची माहिती नमूद करा म्हणजे लवकरच आम्ही तुमच्याशी संपर्क करू.अन्यथा सूचित केले नसल्यास, सर्व रखाणे आवश्यक आहेत.

तुमचा लिंग::
वय श्रेणी (आवश्यक)::

तुमच्यासाठी एक योग्य सल्लागार नेमण्यासाठी आम्ही लिंग आणि वय विचारतो सेवेच्या अटी & गोपनीयता धोरण .