मृत विवाहबंधनाच्या बेड्यांत

आमच्या विवाहबंधनात मी एकटीच उरली आहे. माझी कदर कशी करायची किंवा मला साथ कशी द्यायची हे माझ्या पतीला माहीत नव्हतं. आम्ही दोघं लग्न करण्याआधी, सात वर्ष आम्ही एकमेकांशी भेटीगाठी करत होतो आणि लग्नानंतर 13 वर्ष आम्ही सोबत राहिलो, पण हळूहळू आम्ही एकमेकांपासून दूर होत गेलो-इतकं दूर की एकमेकांना समजून घेणं हळूहळू संपलं आणि आता आम्हा दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचा संबंधच उरल्लेला नाही.

माझी इच्छा होती की त्यांनी माझं म्हणणं ऐकून घ्यावं, मला काय वाटतं त्याबद्दल त्यांना काळजी आहे हे दाखवावं आणि मला कोणत्या गोष्टींचा त्रास होतो याकडे लक्ष द्यावं. पण तसं करण्याची त्यांची मुळीच इच्छा नव्हती. घराबाहेर इतरांसाठी ते “चांगला मित्र" होते, पण अनेक वर्ष मला वाटायचं की सर्वच बाबतीत त्यांच्या नजरेत माझं स्थान दुय्यम आहे. मी विचार करायचे, _ते माझ्यासोबत एका मित्राप्रमाणे वागले असते तर किती बरं झालं असतं... मला कसं वाटत आहे हे मी जेव्हा त्यांना सांगितलं तेव्हा माझ्या भावनांची कदर न करता त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. आम्ही एकाच छपराखाली अनोळखी लोकांप्रमाणे राहत होतो; एकमेकांशी बोलणंही जवळजवळ बंद झालं होतं. आम्ही क्वचितच एकमेकांशी बोलायचो, आणि जर बोललोच तर त्या बोलण्याचं रूपांतर नेहमी वादात व्हायचं. त्यांना माझ्या जवळपास असण्याचीही इच्छा नव्हती म्हणून आम्ही वेगवेगळ्या खोल्यांमध्ये झोपायचो.

माझे पती जेव्हा घरी असायचे, तेव्हा ते माझ्यासोबत किंवा आमच्या मुलीसोबत कधीच वेळ घालवत नसायचे. कितीतरी वर्षाआधी ते आम्हाला सोडून गेले, पण या तथ्याचा मी कधीच स्वीकार केला नाही. ते घराबाहेर इतका वेळ घालवायचे की खरं म्हणजे आमच्या मुलीचा सांभाळ मी एकटीनंच केला आहे. लोक त्यांच्यावर प्रेम करायचे; ते त्यांचे हिरो होते आणि त्यांना त्यांची मदत हवी असायची. पण, यामुळे ते स्वतःच्या कुटुंबापासून दूरावले. ते फक्त एक कर्ता पुरुष म्हणून कुटुंबाच्या भौतिक गरजा पूर्ण करत होते, पण मला ते आमच्या मुलीचे वडील म्हणून हवे होते.

माझ्या पतीला दारूचं आणि कामाचं व्यसन लागलं होतं. दर दिवसाच्या शेवटी त्यांना दारू हवी असायची आणि ते घरात दारूच्या पेट्या आणून ठेवायचे. मी रोज संध्याकाळी घरी त्यांची वाट पाहत बसायचे, पण ते ऑफिसमध्ये काहीतरी काम करत असायचे किंवा त्यांच्या मित्रांसोबत वेळ घालवत असायचे. आणि जेव्हा ते घरी यायचे तेव्हा माझ्यासोबत वेळ घालवण्याऐवजी ते दारू पीत बसायचे आणि रात्रभर आपल्या फोनमध्ये काहीतरी करत बसायचे. आम्ही क्वचितच सोबत मिळून कधी जेवण केलं असेल. आठवड्यातून अनेकदा ते पहाटे एक वाजण्याच्या आसपास किंवा त्यानंतर घरी यायचे, आणि म्हणायचे की मी जेवण करून आलो आहे आणि मी अशा प्रकारे त्यांची वाट पाहत बसू नये.

आमच्या लग्नाच्या शेवटच्या काही वर्षात मला कळलं की त्यांच्या आयुष्यात आणखी एक स्त्री आहे, हे जाणून मला धक्काच बसला.

ते मला सांगायचे की त्यांना आता माझ्यासोबत भावनात्मक, मानसिक आणि शारीरिक रीत्या कोणताही संबंध ठेवायचा नाही; पण त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे ते मला त्या वेळी कळलं नव्हतं. आमच्या लग्नाच्या शेवटच्या काही वर्षात मला कळलं की त्यांच्या आयुष्यात आणखी एक स्त्री आहे, हे जाणून मला धक्काच बसला. त्यांच्या व्यभिचाराकडे मी कानाडोळा केला आणि ते भावनात्मक आणि शारीरिक रित्या दुसऱ्या स्त्रीमध्ये गुंतलेले आहेत हे माहीत असूनही मी त्यांच्यासोबत राहू लागले. त्यांना सोडण्याची माझी मुळीच इच्छा नव्हती. ते पूर्णपणे माझा त्याग करतील याची मला भीती वाटायची.

त्यांना नेमकं काय म्हणायचं होतं ते जेव्हा मला कळलं तेव्हा मी स्वतःला रेशीम किड्याप्रमाणे जणूकाही कोशात डांबून घेतलं. मला एकटीलाच राहायचं होतं कारण त्यांना द्यायला आता माझ्याकडे काहीच उरलं नव्हतं. मी माझ्या मनाशी आणि आमच्या नातेसंबंधाशी संघर्ष करत होते. मी त्यांच्या वर्तणुकीबद्दल बोलले तर आमच्यामध्ये भांडण झालं असतं आणि पुन्हा ते दारू प्यायला बसले असते. मला मानसिक त्रास होत आहे असा विचार करून मी एका मानसशास्त्रज्ञाकडे उपाचारासाठी जाऊ लागले. नैराश्यातून बरे होण्यासाठी मी डॉक्टरनं सांगितलेला औषधोपचार सुरू केला. त्या औषधामुळे मला एकटेपणा वाटायचा आणि वाटायचं की मी आता कधीच बरी होणार नाही.

मला काय होत आहे याकडे त्यांनी कधीच लक्ष दिलं नाही, कारण ते एकतर कामात व्यस्त असायचे किंवा इतर कुठंतरी असायचे. आमच्या मृत विवाहातील त्यांची भूमिका ते मान्य करत नसल्यामुळे मी पूर्णपणे विस्कळीत झाले. विवाहित जोडप्यांसाठीच्या समुपदेशनासाठी मी त्यांना माझ्यासोबत यायला सांगितलं तेव्हा त्यांनी येण्यास साफ नकार दिला. मी एकटीच मानसशास्त्रज्ज्ञाकडे उपचारासाठी जायचे त्यामुळे त्यांनी कुटुंबीयांना आणि मित्रमैत्रिनींना सांगितलं की माझी मानसिक स्थिती ठीक नाही.

कितीतरी वर्षं मी स्वतःला एकांतात कोंडून घेतलं होतं.

मी स्वतःवर-फक्त स्वतःवर कार्य करण्याद्वारे मी माझ्या नैराश्यावर मात करू शकले. ज्या कुटुंबीयांनी आणि मित्रमैत्रिणींनी मी जशी आहे तशी मला स्वीकारलं, त्यांच्यासोबत मी वेळ घालवू लागले. आमच्या मृत विवाहासाठी सहसा मला जबाबदार धरण्यात यायचं; पण ज्यांनी मला अशा मृत विवाहाच्या बेड्यांतून मुक्त होण्यास मदत केली, अशा सुदृढ समूहांसोबत मी सहवास करू लागले. मला जाणवलं, की ज्या बिनशर्त प्रेमाची आणि स्वीकतीची मला गरज आहे त्यासाठी मला देवाकडे वळावं लागेल.

कितीतरी वर्ष मी स्वतःला एकांतात कोंडून घेतलं होतं. मी एकटीच माझ्या जीवनभर तणावाचा सामना करत असल्यामुळे आणि इतरांसमोर माझ्या भावना व्यक्त न केल्यामुळे भावनात्मक रीत्या माझं अतोनात नुकसान झालं होतं. एका मृत नातेसंबंधाचा अंत करण्याद्वारे, मी त्यातून बरी होऊ शकले आणि पुन्हा एकदा स्वतःवर नियंत्रण मिळवू शकले, आणि पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करू शकले.

मला वाटतं की हळूहळू मी मुक्ततेच्या मार्गार वाटचाल करत आहे. मला ज्या काही गोष्टींचा सामना करावा लागला त्यामुळे मी कधी विचारही केला नव्हता इतकी मी मजबूत होऊ शकले. मी माझ्या जीवनात अनेक रंगछटा असलेल्या गोष्टी अनुभवल्या आहेत-त्यांच्यापैकी काही गोष्टी सॉम्य स्वरूपाच्या तर काही तीव्र स्वरूपाच्या होत्या. मी आतापर्यंत जो काही कॅनव्हास रंगविला आहे तो फक्त या गोष्टींमुळेच. आता मला वाटतं की माझ्या संघर्षामागे एक उद्देश दडलेला होता.

जर तुम्ही आज भावनात्मक त्यागाचा सामना करत असाल, तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्हाला एकट्याला या गोष्टीचा सामना करण्याची मुळीच गरज नाही. भावनात्मक त्रासातून मुक्त होण्यासाठी त्याबद्दल कोणाशीतरी बोलणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही खाली तुमचा ईमेल आणि नाव नमूद कराल, तर आमच्या गोपनीय आणि मोफत सल्लागारांपैकी कोणीतरी एक जण लवकरच तुमच्याशी संपर्क करेल आणि तुम्हाला मदत करेल. तुम्ही स्वतःच्या खऱ्या किंवा खोट्या नावाने माहिती देऊ शकता. ते तुमच्यावर अवलंबून आहे

गोपनीयतेच्या कारणांमुळे लेखकाचे नाव बदलण्यात आले आहे
छायाचित्र सौजन्याने Clem Onojeghuo

तुम्ही एकटेच प्रवास करण्याची गरज नाही. एखाद्या सल्लागाराशी बोला. हे गोपनीय आणि नेहमी मोफत आहे.

या समस्यांना सामोरे जाणे कठीण होऊ शकते. तुम्ही स्वतःला किंवा इतरांना इजा करण्याचा विचार करत असाल, तर कृपया हे वाचा!

कृपया खाली दिलेल्या फॉर्ममध्ये तुमची माहिती नमूद करा म्हणजे लवकरच आम्ही तुमच्याशी संपर्क करू.अन्यथा सूचित केले नसल्यास, सर्व रखाणे आवश्यक आहेत.

तुमचा लिंग::
वय श्रेणी (आवश्यक)::

तुमच्यासाठी एक योग्य सल्लागार नेमण्यासाठी आम्ही लिंग आणि वय विचारतो सेवेच्या अटी & गोपनीयता धोरण .