अकल्पनीय वेदना

दुर्व्यवहाराच्या जखमा किती अकल्पनीय असतात, हे ज्यांच्यासोबत दुर्व्यवहार केला जातो फक्त त्यांनाच माहीत. आणि या केवळ वरवरच्या भावना नसून, आपल्यावर खोलवर परिणाम करतात. यामुळे सर्व नात्यांच्या जणू चिंधड्या उडतात. तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता तीच व्यक्ती जर तुमच्यासोबत दुर्व्यवहार करत असेल, तर हे सर्व जग जणू खाली कोसळतं, सर्वकाही जसं खोलात बुडून जातं. दुर्व्यवहार, मग तो कोणत्याही प्रकारचा असो, तो सहन केला जाऊ नये; मी हे माझ्या स्वतःच्या त्रस्त संसारातून हळूहळू शिकत गेले आहे. मला फक्त शारीरिक जखमा झाल्या नाहीत, तर माझ्या हृदयावर जखमा झालेल्या आहेत आणि मनावर त्याच्या खुणा खोलवर कोरल्या गेलेल्या आहेत.

हे सर्व घडत असताना, वेदना आणि गमावल्याची भावना दर्शवण्यासाठी मी एक कविता लिहिली.

सोबत घालवलेले ते प्रियाराधनेचा काळ
ते तास न् तास गप्पा मारणे
ते एकमेकांवरील प्रेम
लहान-सहान गोष्टींसाठी भांडण करणे
रात्रभर बोलत बसणे, गुपिते एकमेकांना सांगणे
विचित्र स्वप्ने, एकमेकांवर हक्क सांगणे
विचित्र व्यवहार, तुझ्या फोनची वाट पाहणे
तुझे फोटो आणि संदेश वारंवार पाहणे
अकारण हसणे, डोळे मिटून तुझ्यावर भरवसा करणे
तुझे आलिंगन आणि चुंबन, तुझ्या निरागस इच्छा!
आणि आता हा विवाह म्हणजे केवळ एक रिकामा इनबॉक्स,
आता नाही कॉल्स, ना आता माझे तुझ्यावर प्रेम आहे म्हणणे
अंधाऱ्या रात्री, इजा आणि वेदना, दुर्व्यवहार आणि यातना
तास न् तास एकाकीपणा, व्यक्त न केलेल्या भावना
रात्र-रात्र रडणे, हृदयविदारक गुपिते
धक्कादायक विश्वासघात, भंगलेली स्वप्ने
मिटवलेल्या आठवणी, खोटे स्मितहास्य
तुटलेला भरवसा, अप्रामाणिक मनोयातना —
माहीत नाही मला, का म्हणून तुझी ओढ लागली!

ते जेव्हाजेव्हा माझ्यासोबत भांडण करायचे, तेव्हातेव्हा मला खूप जास्त भावनिक त्रास व्हायचा—माझं नियंत्रण सुटायचं. असं करून मीच त्यांना मला यातना द्यायचा जणू अधिकार द्यायचे. भांडणाच्या वेळी, त्यांनी माझ्या भावनांची जराशीही कदर केली, तर मी त्यांच्यावर भरवसा करायचे. मी त्यांच्यावर विश्वास ठेवायचे. पण वास्तवात मात्र, त्यांच्या हिंदु कुटुंबाचा हस्तक्षेप, त्यांचं दारूचं व्यसन, आणि त्यांचा निर्दयीपणा यांमुळे उद्भवणाऱ्या असंगततेच्या समस्यांमुळे ते मला फक्त गृहीत धरायचे. खरंतर, ते मला एका दासीप्रमाणे वर्तणूक द्यायचे.

दारूमुळे तर ते आणखीनच जास्त वाईट व्यवहार करायचे. दारू प्यायल्यानंतर, ते आपली तर्कशक्ती आणि आपल्या भावना विसरून जायचे—आणि अशा वेळी ते मला शारीरिक मारहाण करायचे. माझे म्हणणे कदाचित थोडी अतिशयोक्ती वाटेल, पण अशा वेळी मी विचार करायचे की ते माझ्या प्रेमाच्या लायकीचे नसूनही मी त्यांच्यावर प्रेम करायचे, कदाचित, यामुळेच मी दुर्व्यवहारास पात्र नसूनही ते मला अशा प्रकारे यातना देत राहायचे.

माझी मुलगी मोठी होत असताना मला म्हणायची, “आई, कधीकधी मला भीती वाटत असते, की बाबा जसं तुला मारतात तसंच मलाही मारतील की काय.”

मी त्यांच्यावर इतकं आंधळं प्रेम करायचे की मी कितीतरी वर्षांपर्यंत माझ्या कुटुंबापासून आणि मित्रमैत्रिणींपासून त्यांचं खरं चरित्र लपवून ठेवलं. मी आपली ओळख, सदाचार आणि विवाहातील आदर गमावलं. मी निराश आणि अपमानित झाले. त्यांनी मला आतून आणि बाहेरून, तुम्ही कल्पना करू शकत नाही अशा प्रत्येक मार्गानं नाकारलं. मी त्यांच्यासाठी एखाद्या जुन्या निरुपयोगी फर्निचरप्रमाणे झाले होते—ज्याची त्यांना विल्हेवाट लावायची होती.

ते जेव्हा कधी मला शारीरिक मारहाण करायचे तेव्हा त्यांना याची जाणीव नसायची, की एकेकाळी माझं त्यांच्यावर जे प्रेम होतं त्याचे ते तुकडे-तुकडे करत आहेत. असंगततेच्या आधारावर त्यांनी जर मला घटस्फोट दिला असता तर प्रामाणिक आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून ते खूप बरं झालं असतं. पण त्यांनी तसं केलं नाही; कारण यात त्यांचा अहंकार मध्ये यायचा. मी दोन परस्परविरुद्ध विचारांनी ओढली जात होते. एक म्हणजे मला त्या माणसाच्या बाबतीत हार मानायचं नव्हतं ज्याच्यावर मी प्रेम करायचे आणि दुसरं म्हणजे हेही तितकंच खरं होतं की ज्याच्यावर मी प्रेम करायचे तो माणूसच मुळी अस्तित्वात नव्हता, आणि याच कारणामुळे मी त्यांच्यासोबत राहत होते.

त्यांचं एका स्त्रीसोबत विवाहबाह्य संबंध आहे हे मला कळलं तेव्हा तर मला धक्काच बसला. मला या संबंधांची शंका होती, पण मागील एक वर्षापासून ते ही गोष्ट नाकारत होते. असं असूनही, ते जेव्हा पाहिजे तेव्हा माझा वापर करायचे आणी माझ्याशी दुर्व्यवहार करायचे. मी पूर्णपणे उद्धवस्त झाले होते—मी वेडी झाले होते, मला झोप नाही यायची किंवा मी जेवण नाही करायचे. मी त्यांच्याशी किंवा इतरांशी क्वचितच बोलायचे. हळूहळू याचा माझ्या मनावर भयंकर परिणाम होऊ लागला.

हे सगळं माझ्या मुलीसमोर घडू लागलं होतं. ती अजूनही म्हणते, की “बाबानं आईला धक्का दिला आणि बाथरूममध्ये बंद केलं.” माझी मुलगी मोठी होत असताना मला म्हणायची, “आई, कधीकधी मला भीती वाटत असते, की बाबा जसं तुला मारतात तसंच मलाही मारतील की काय.”

मी माझ्या चिमुकल्या मुलीसाठी हे सर्व सहन करत होते. माझ्या मुलीला आईची किंवा वडिलाची कमतरता भासू नये, म्हणून मी या नातेसंबंधात राहू इच्छित होते. पण, वातावरण इतकं दूषित झालं होतं की या वातारणात सामान्य जीवन जगणं तिच्यासाठी अशक्य झालं होतं.

मागील कित्येक वर्षांदरम्यान, मला सर्व प्रकारे शारीरिक त्रास दिल्यानंतर, ते म्हणायचे की आता मला तुझी गरज नाही आणि तू मेली तरी चालेल. त्यांनी असं म्हटलं, तेव्हा जणूकाय मी माझं सर्वकाही गमावलं—मला इतकं दुःख झालं होतं की मी त्यांच्या डोळ्यांसमोर आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता. पाठदुखीच्या त्रासासाठी मी घेत असलेल्या मार्फीन-आधारित औषधाच्या अनेक गोळ्या मी एकाच वेळी खाल्ल्या.

या घटनेमुळे माझ्या जीवनात मोठा बदल घडून आला; मी आयसीयूमध्ये अजूनही जिवंत होते, मला श्वास घ्यायला त्रास होत होता, हे वेदनादायक आणि भयंकर होतं. माझी अवस्था दयनीय आणि आशाहीन होती, आणि मला मरावसं वाटत होतं. माझे आईबाबा माझ्याजवळ राहिले आणि त्यांनी मला आधार आणि बळ दिला, ज्याची मला बरे होण्यासाठी अत्यंत गरज होती. मी मागील एक वर्षापासून नैराश्येचा सामना करत होते आणि नैराश्येवर उपचार घेत होते. इस्पितळात असताना मी देवाला प्रार्थना केली, आणि एका मृत आणि दुर्व्यवहारपूर्ण नातेसंबंधामुळे मी माझं अमूल्य जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता त्याबद्दल देवाची क्षमा मागितली. मी मनसोक्त रडले. इस्पितळातून सुट्टी मिळाल्यावर, मला जाणवू लागलं की मी आता आधीसारखी अशक्त स्त्री राहिली नाही.

मला माझ्या आंतरिक शक्तीची अनुभूती झाली; माझ्या दुःखांनी मला इतकं सशक्त बनवलं होतं की आता कोणतीही गोष्ट मला आणखी त्रास देऊ शकणार नव्हती. आता मला मुक्त व्हायचं होतं माझ्या वेदनादायक बंधनातून—आशाहीन नातेसंबंधातून ज्यात मी लग्नानंतर कितीतरी वर्ष जगत होते. मला आता कोणत्याही पुरुषाविना एक स्वतंत्र जीवन जगायचं होतं. शेवटी, मी माझ्या दुर्व्यवहारपूर्ण नातेसंबंधाचा त्याग करायला सुरुवात केली. मी चुका केल्या आणि ते ठीक आहे. पण, आता मला कोणीही गृहीत धरू नये आणि माझ्याशी दुर्व्यवहार करू नये असं मला वाटत होतं. आता त्या माणसासोबत एकाच छताखाली राहण्याची माझी मुळीच इच्छा नव्हती ज्याच्यामुळे माझं जीवन उद्ध्वस्त झालं होतं.

त्यांनी माझ्यावरील सर्व सत्ता गमावली.

मी प्रत्येक क्षणाला आधीपेक्षा आणखी सशक्त होत चालली आहे. प्रार्थना आणि मार्गदर्शनामुळे माझ्यामध्ये चिकाटी निर्माण झाली आहे, आणि त्यामुळे आपल्या मुलीसोबत एक अर्थपूर्ण जीवन जगण्याची संधी मला लाभली आहे. ते जेव्हा भांडण करायला सुरुवात करायचे तेव्हा नियंत्रणात राहणं मला शक्य झालं. त्यामुळे, त्यांनी माझ्यावरील सर्व सत्ता गमावली. शेवटी, माझ्यासोबत दुर्व्यवहार केला जावा आणि माझा वापर केला जावा यासाठी मी लग्न केलं नाही, आणि मी माझ्या मुलीला दुर्व्यवहारपूर्ण विवाह दाखवण्याऐवजी एकटी आई म्हणून जगणं पसंत करीन याची जाणीव जेव्हा मला झाली तेव्हा माझे सर्व दुःख नाहीसे झाले. मी नरक यातनेतून सुखरूप बचावले आणि सशक्त होऊन एक नवीन जीवन जगण्यासाठी त्यातून बाहेर आले.

मला जीवनात पुढे जायचे आहे हे मला माहीत होते आणि त्या दृष्टीने मी पावले टाकायला सुरुवात केली. मी मनसोक्त रडले, आणि एकदाचं रडून झाल्यावर मी ठरवलं की आता त्याच त्या दुर्बलतांसाठी परत रडायचं नाही. आज, मी अगदी माझ्या मनापासून हसू शकते, कारण मी अजूनही जिवंत आहे. मला खाली पाडून तुडवण्यात आलं, पण मी सशक्त होऊन आणि आणखी निर्धार करून पुन्हा उठून उभी राहिले.

कोणत्याही स्त्रीने कधीही शारीरिक मारहाण अनुभवू नये. पण, जर तुम्हाला हा अनुभव आला असेल, तर तुम्ही एकटे नाही, आणि तुम्ही कमजोर नाही. तुम्ही इतके सशक्त आहात की तुम्ही जीवनात पुढे जाऊ शकता आणि मदत आणि मार्गदर्शन मिळवू शकता. तुमच्या या प्रवासात तुम्हाला साथ द्यायला आमच्या ऑनलाईन सल्लागारांपैकी एकाला नक्कीच आवडेल. कृपया, तुमच्या संपर्काची माहिती खाली नमूद करा, आणि लवकरच आम्ही तुमच्याशी संपर्क करू.

गोपनीयतेच्या कारणांमुळे लेखकाचे नाव बदलण्यात आले आहे.
छायाचित्र सौजन्याने Nadja Tatar

तुम्ही एकटेच प्रवास करण्याची गरज नाही. एखाद्या सल्लागाराशी बोला. हे गोपनीय आणि नेहमी मोफत आहे.

या समस्यांना सामोरे जाणे कठीण होऊ शकते. तुम्ही स्वतःला किंवा इतरांना इजा करण्याचा विचार करत असाल, तर कृपया हे वाचा!

कृपया खाली दिलेल्या फॉर्ममध्ये तुमची माहिती नमूद करा म्हणजे लवकरच आम्ही तुमच्याशी संपर्क करू.अन्यथा सूचित केले नसल्यास, सर्व रखाणे आवश्यक आहेत.

तुमचा लिंग::
वय श्रेणी (आवश्यक)::

तुमच्यासाठी एक योग्य सल्लागार नेमण्यासाठी आम्ही लिंग आणि वय विचारतो सेवेच्या अटी & गोपनीयता धोरण .