एक सततचा अंधार
जानेवारी २०१६ च्या सुरुवातीला माझे तणाव-प्रेरित निराशा असल्याचे निदान झाले. त्याने जीवन ठप्प झाले होते. त्यामुळे मी कुटुंब किंवा कामावर लक्ष केंद्रित करू शकत नव्हतो. जणू काही माझ्या मनाला अंधाराच्या ढगांनी वेढले होते. खाणे, झोपणे, बोलणे, किंवा समस्या सोडवणे यासारखी साधी, दैनंदिन कामे ही माझ्यासाठी मोठी आव्हाने झाली होती.
निराशेचा भितीदायक भाग असा होता की तो माझ्या डोक्यात हळूवारपणे शिरला होता. त्यामुळे ज्या लक्षणांचा सामना मला करावा लागला त्याची कल्पना सुद्धा मला नव्हती.— जे विनाकारण थकवा येणे, चिडचिड होणे, झोप न येणे, सामान्य गोंधळ आणि अनुपस्थिती मानसिकता ही निराशेची लक्षणे आहेत. मला जाणवलेले दुसरे लक्षण म्हणजे आनंद आणि शांततेचा अभाव.
मला फक्त एवढंच आठवतं की मला ऑफिसला जाणं आवडत नव्हते कारण मला माझ्या नवीन भूमिकेच्या आवश्यकता किंवा व्यवसायातील बारकावे समजू शकले नाहीत. भीती मला सतत ग्रासत होती. जेव्हा मी घरी परतलो, तेव्हा मला माझी नोकरी आणि माझ्या कुटुंबासाठी उत्पन्नाचा स्रोत गमावण्याची काळजी वाटायची. त्यामुळे परिस्थिती आणखीनच बिकट झाली. बहुतेक रात्री जागे राहिल्याने, माझे मन सतत अशांततेच्या स्थितीत असायचे, त्यात सर्व प्रकारच्या अवास्तव परिस्थितीची कल्पना करत असायचे. झोपेच्या कमतरतेमुळे दुसऱ्या दिवशी परिस्थिती आणखीनच बिकट होत असे. हे एक दुष्टचक्र चालू होते.
मला होणार्या दु:खातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नव्हता.
माझ्या निराशेचे कारण त्यावेळी स्पष्ट नव्हते. पण आता जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा मला दिसले की कदाचित अनेक कारणांमुळे हे घडले असावे, ज्यात माझे काका आणि त्यांच्या मुलाच्या मृत्यूचा समावेश होता, ज्यांच्याशी माझी खूप जवळीक होती. मला होणार्या दु:खातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नव्हता. एक माणूस, पती, वडील आणि माझ्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा या नात्याने, मला माझ्या कुटुंबासाठी खंबीर होऊन कामावर परत जावे लागले.
त्याच वेळी, कुटुंबापुढे इतर अवघड आव्हाने होती. माझ्या आईला डेंग्यू झाला होता, जो तिच्या वयात जीवघेणा ठरू शकत होता. त्याचवेळी, माझ्या सासूबाईंना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यांना दुहेरी गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया करावी लागणार होती. शिवाय, सर्वात जास्त म्हणजे नवीन नोकरीमध्ये मला जेमतेम काही महिनेच झाले होते आणि कामगिरीचे दडपण तीव्र होते.
मी आत्महत्येचा विचार करू लागलो, पण माझ्याशिवाय माझे कुटुंब काय करेल या चिंतेने मला त्यापासून रोखले. एका प्रिय चुलत भावाच्या पत्नीने, जी एक डॉक्टर आहे, मला वैद्यकीय मदत घेण्यास सुचवले. मी एका डॉक्टरला भेटलो ज्याने मला अनेक औषधे लिहून दिली ज्यामुळे माझी स्थिती आणखी वाईट झाली, त्याने मला फक्त अधिक गोंधळात टाकले. मी चांगला होण्याऐवजी वाईट का होत आहे?
एका जवळच्या कौटुंबिक डॉक्टरांनी मग मला मानसोपचारतज्ज्ञाकडे जाण्याचा सल्ला दिला. त्याने माझे बोलणे ऐकले आणि मला औषधोपचाराच्या नवीन कोर्सवर ठेवले. हा डॉक्टर खूप धीर देणारा होता, आणि मला जे वाटत होते तेथे मी त्यांच्याशी बोलू शकलो. हळूहळू पण स्थिरपणे मला चांगले बरे वाटू लागले. मला आणि डॉक्टर दोघांनाही खात्री होईपर्यंत की मला यापुढे याची गरज नाही, तो पर्यंत वैद्यकीय उपचार काही महिने चालू राहिला.
मला असे काहीतरी सापडले जे मी क्वचितच अनुभवले होते - ते म्हणजे स्वीकृती
याच सुमारास माझी पत्नी एका अध्यात्मिक समुदायात सहभागी झाली होती आणि मलाही तिच्यासोबत जाण्याचा ती सुचवत होती. मी तिला शांत करण्यासाठी नाखुशीने तिच्यासोबत गेलो. हे लोक कशी मदत करू शकतात हे मी प्रामाणिकपणे पाहिले नव्हते. परंतु काही वेळा तेथे उपस्थित राहिल्यानंतर, मला असे काहीतरी सापडले जे मी क्वचितच अनुभवले होते - ते म्हणजे स्वीकृती. मला स्वीकारणार्या लोकांच्या समूहाने मला वेढले आणि एक व्यक्ती, एक पती आणि वडील म्हणून. मला माझी खरी योग्यता समजली - आता मी माझ्या मुलांना आणि पत्नीला माझ्या नजरेत त्यांची किंमत कळावी यासाठी मी प्रयत्नशील झालो.
जर तुम्हाला निराशेच्या गर्तेत अडकलेले असे वाटत असेल, तर तुम्हाला त्यातूमधून एकट्याने प्रवास करण्याची गरज नाही हे मला तुम्हाला कळवावे असे वाटते. निराशेमुळे अनेकदा एकटेपणा येतो, पण निराशेच्या धुक्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला जे आवश्यक आहे त्याच्या हे उलट आहे. आपण आपल्या वेदनांबद्दल इतरांसोबत बोलले पाहिजे.
या वेबसाइटद्वारे, तुमची गोष्ट ऐकण्यासाठी आणि निर्णय न घेता तुमचे समर्थन करण्यासाठी विनामूल्य आणि गोपनीय मार्गदर्शक येथे तयार आहेत. त्याकरिता तुम्ही तुमची माहिती खाली भरल्यास, तुम्हाला लवकरच एका मार्गदर्शका कडून मार्गदर्शन मिळेल. त्याकरिता तुम्ही तुमचे खरे नाव किंवा खोटे नावही वापरू शकता. हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे.
तुम्ही एकटेच प्रवास करण्याची गरज नाही. एखाद्या सल्लागाराशी बोला. हे गोपनीय आणि नेहमी मोफत आहे.
या समस्यांना सामोरे जाणे कठीण होऊ शकते. तुम्ही स्वतःला किंवा इतरांना इजा करण्याचा विचार करत असाल, तर कृपया हे वाचा!
कृपया खाली दिलेल्या फॉर्ममध्ये तुमची माहिती नमूद करा म्हणजे लवकरच आम्ही तुमच्याशी संपर्क करू.अन्यथा सूचित केले नसल्यास, सर्व रखाणे आवश्यक आहेत.