नियंत्रण गमावणे

जीवन मजेशीर होतं-मी एका प्रसिद्ध युरोपियन फॅशन ब्रँडसोबत काम करत होतो. मला माझं काम खूप आवडायचं आणि ते कामाप्रती माझ्या समर्पणातून दिसत होतं. मी भरभर प्रगती केली आणि लवकरच वरच्या पदावर पोहचलो आणि मला इतर ठिकाणी प्रवास करण्याची आणि मोठमोठे निर्णय घेण्याची संधी मिळाली. सर्वकाही उत्तम चाललं होतं.

नव्या जबाबदाऱ्यांसोबत मनोरंजनाचे नवीन पर्यायदेखील माझ्यासमोर निर्माण झाले. कंपन्यांच्या मोठमोठ्या पार्ट्यांचे निमंत्रण मला मिळू लागले. मला नाचगाणं आणि दारू पिणं आवडू लागलं. हळूहळू मी या जगात ओढलो गेलो जिथं दारू पिणं माझ्यासाठी अत्यावश्यक बनलं. माझ्या मित्रांनी जरी मला वाईट परिणामांची ताकीद दिली असली, तरीही मी मोजमजा करतच राहिलो. लवकरच, मला दारूचं व्यसन लागलं.

मला दारूचं इतक व्यसन लागलं की एकदा दारू प्यायला सुरुवात केली की मी कितीतरी दिवस दारू पीत राहायचो. कधीकधी तर सलग पाच-सहा दिवस पीत. जेव्हा जेव्हा झोपेतून उठायचो तेव्हा तेव्हा दारू प्यायचो. दारू माझ्यासाठी अत्यावश्यक बनलं होतं. व्यसनाच्या अगदी खालच्या पातळीवर, मी इतकी दारू पीत राहिलो की माझं शरीर दारू सहन करू शकत नव्हतं. ऑफिस पार्टयांमध्ये “निरुपद्रवी' वाटणारं मनोरंजन आता माझा जीव घेण्यासाठी अगदी तयार होतं.

ऑफिस पार्टयांमध्ये 'निरुपद्रवी' वाटणारं मनोरंजन आता माझा जीव घेण्यासाठी अगदी तयार होतं.

माझ्या जीवनावर माझं नियंत्रण नाही, असं मला वाटत होतं. माझी मलाच लाज वाटत होती. मी इतरांसोबत वेळ घालवू इच्छित नव्हतो. मी माझ्या घराबाहेर जाऊ इच्छित नव्हतो. दारूच्या व्यसनामुळे लवकरच माझ्या कुटुंबात समस्या निर्माण झाल्या. मी रोज रात्री दारू पिऊ लागलो आणि जे माझ्या अगदी जवळचे आहेत त्यांना त्रास देऊ लागतो.

मी आपल्या जीवनावर नियंत्रण मिळवू इच्छित होतो, स्वतःला बदलू इच्छित होतो, पण तसं करू शकत नव्हतो. हताश होऊन मी ओरडायचो. मला मदतीची गरज होती.

माझा परतीचा प्रवास सुरू झाला. सात वर्ष मी दारूच्या व्यसनानं ग्रस्त होतो. दारूमुळे माझ्या शरीराला आणि नातेसंबंधांना नुकसान पोहचलं होतं. हे सगळं थांबणं गरजेचं होतं. पण ते सोपं नव्हतं. मला दारू प्यायची गरजच भासणार नाही अशी वेळ यायला तीन वर्ष लागली. मी कबूल करतो की दारूच्या व्यसनातून मुक्त्त होण्याचा माझा प्रवास सोपा नव्हता. दारू सोडून चार वर्ष झाल्यानंतर मी परत एकदा दारू पिऊ लागलो. पण, मी पुन्हा एकदा उठून उभा राहिलो आणि सत्याचा सामना केला- हे थांबलंच पाहिजे. आत्ताच!

माझी मैत्री एका माणसाशी झाली, ज्यानं सहनशीलतेनं आणि धीरानं मला नेहमीसाठी दारू सोडण्यास मदत केली. मला एका अयशस्वी माणसाप्रमाणे जगण्याची गरज नाही, आणि जीवनात अजूनही आशा आहे आणि जीवनात कितीतरी सुंदर गोष्टी आहेत हे समजण्यास त्यानं मला मदत केली. आज मी दारूचा गुलाम नाही. आता एक स्वतंत्र व्यक्ती या नात्यानं आपल्या आजूबाजूला असलेल्या सौंदर्याचा आनंद अनुभवनं मला शक्य झालं आहे.

जर तुम्हालाही दारूचं व्यसन लागलेलं असेल, तर हा प्रवास तुम्ही एकट्यानंच करण्याची गरज नाही, हे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो. गोपनीयता बाळगून मोफत तुमचे ऐकून घेण्यास तयार असलेले आणि दारूच्या व्यसनातून मुक्त्त होण्यास तुम्हाला मदत करणारे सल्लागार आमच्याकडे आहेत. जर तुम्ही खाली दिलेल्या फॉर्ममध्ये तुमची माहिती नमूद कराल, तर आमच्यापैकी कोणीतरी तुमच्याशी लवकरच संपर्क करेल.

गोपनीयतेच्या कारणांमुळे लेखकाचे नाव बदलण्यात आले आहे.
छायाचित्र सौजन्याने Kat Northern Lights Man

तुम्ही एकटेच प्रवास करण्याची गरज नाही. एखाद्या सल्लागाराशी बोला. हे गोपनीय आणि नेहमी मोफत आहे.

या समस्यांना सामोरे जाणे कठीण होऊ शकते. तुम्ही स्वतःला किंवा इतरांना इजा करण्याचा विचार करत असाल, तर कृपया हे वाचा!

कृपया खाली दिलेल्या फॉर्ममध्ये तुमची माहिती नमूद करा म्हणजे लवकरच आम्ही तुमच्याशी संपर्क करू.अन्यथा सूचित केले नसल्यास, सर्व रखाणे आवश्यक आहेत.

तुमचा लिंग::
वय श्रेणी (आवश्यक)::

तुमच्यासाठी एक योग्य सल्लागार नेमण्यासाठी आम्ही लिंग आणि वय विचारतो सेवेच्या अटी & गोपनीयता धोरण .