जगण्यात काही फायदा नाही

मी आठ वर्षांचा होतो, तेव्हापासून मी गांजा ओढायला सुरुवात केली. माझे आजोबा वैद्यकीय कारणांसाठी गांजाचा वापर करायचे, म्हणून मी त्यांना नेहमी गांजा ओढताना पाहायचो. त्यांचं ओढून झाल्यानंतर काही उरलेला गांजा ते ठेवून द्यायचे, मग मी तो घेऊन बाहेर जायचो आणि मी स्वतः गांजा ओढायचो.

मी 12 वर्षांचा होतो, तेव्हा आम्ही एका नवीन ठिकाणी राहायला गेलो, आणि त्या वयात नवीन ठिकाणी राहायला जाणं माझ्यासाठी खूपच कठीण होतं. तिथं एक वर्षं होऊनही, मला फक्त दोनच मित्र होते. म्हणून मी आणखी जास्त गांजा ओढू लागलो. अशा प्रकारे मी आनंदी राहण्याचा प्रयत्न करू लागलो. एक दिवस, माझे मित्र माझ्या मागंमागं जंगलात आले आणि मी गांजा ओढत असताना त्यांनी मला पाहिलं; त्यानंतर ते माझ्यासोबत जवळजळव दीड वर्षपर्यंत बोलले नाहीत. मला फक्त दोनच मित्र होते, आणि आता तेदेखील माझ्याशी बोलत नव्हते.

म्हणून मी खूपच निराश झालो. तुमच्यासोबत जर कोणीच बोलत नसेल, तर तुम्हालाही कदाचित असंच वाटलं असतं. मी आणखी जास्त गांजा ओढू लागलो, आणि मग मला पैशांची कमतरता जाणवू लागली, त्यामुळे मला आणखी गांजा कसा मिळेल मी याचे मार्ग शोधू लागलो. म्हणून मी गांजाची खरेदी-विक्री करू लागलो. माझा हा धंदा बऱ्यापैकी चालला, आणि मी पुष्कळ पैसे कमावलेदेखील. मी ज्यांच्यासोबत व्यवहार करायचो त्यांनी मला अनेकदा जिवे मारण्याची धमकी दिली. आणि या सर्व गोष्टींची माझ्या आईवडिलांना जराही कल्पना नव्हती.

या सर्व काळादरम्यान, मी खूपखूप निराश झालो होतो. मला वाटायचं की मला कोणीच समजून घेत नाही. फक्त गांजामुळेच मला बरं वाटायचं आणि आनंद मिळायचा. कधीकधी, मी जेव्हा खूप नैराश्यात असायचो, तेव्हा मी माझ्या बंदुकीमध्ये एक गोळी घालायचो, आणि बंदूक माझ्या डोक्यावर ताणून ट्रिगर दाबायचो.

मग, 3 जानेवारी 2015 च्या रात्री मला खूप सारा गांजा मिळाला. माझ्या झोपायच्या खोलील एका टेबलावर गांजा पसरलेला होता. मी निर्णय घेतला, की आज रात्री एकतर मी स्वतःचं जीवन संपवणार किंवा माझ्याकडे असलेला सर्व गांजा ओढणार. माझ्या हातात मी एक चाकू घेतला; आपलं मनगट चाकुनं कापण्याचा माझा विचार होता. पण, मी मोठ्या आवाजात संगीत लावला होता, म्हणून आई माझ्या खोलीत आली. तिनं सर्व पसारा पाहिला आणि तिला धक्काच बसला. तिला वाटलं की तो सर्व गांजा माझ्या आजोबांचा असावा. आईनं माझ्या वडिलांना बोलावलं, ते तिथं आले, आणि ते सर्व पाहून त्यांनादेखील धक्का बसला.

मी निर्णय घेतला, की आज रात्री एकतर मी स्वतःचं जीवन संपवणार किंवा माझ्याकडे असलेला सर्व गांजा ओढणार.

त्या दरम्यान माझं आणि माझ्या वडिलांचं एकमेकांसोबत पटत नव्हतं, म्हणून ते जेव्हा तिथं आले तेव्हा परिस्थिती आणखीनच बिघडली. त्यांनी आजोबांना बोलावण्याची धमकी दिली. तसं केल्यास माझे आजोबा संकटात सापडणार होते. माझ्या हातात अजूनही चाकूं होता, म्हणून मी तो चाकू माझ्या वडिलांवर रोखून धरला. मला आठवत नाही, पण आईनं माझ्या हातातून चाकू हिसकावून घेतला होता, आणि आता चाकू तिच्या हातात होता.

ती रात्र माझ्या जीवनात मोठा बदल घेऊन आली. मी खूप घाबरून गेलो होतो.

त्यानंतर, नैराश्याचा सामना करण्यासाठी मला मदत मिळू लागली. माझ्या नैराश्यासाठी औषधोपचार सुरू करण्यात आला आणि एका समुपदेशकाचा सल्ला घ्यायचंदेखील सुरू झालं. जानेवारीच्या त्या रात्रीपासून मी गांजा ओढला नाही, आणि त्यामुळे मला खूप मदत मिळाली. मी अजूनही रागीट स्वभावाचा आहे, पण स्वतःला शारीरिक गोष्टींमध्ये व्यस्त ठेवण्याद्वारे त्यावर नियंत्रण ठेवणं मला शक्य झालं आहे. आणि मी कितीतरी नवीन मित्रही बनवले आहेत.

तुम्हालाही कदाचित पूर्णपणे एकाकी आणि आपल्याला कोणीच समजून घेत नाही असं वाटत असेल. कदाचित तुम्ही स्वतःचा जीव घेण्याचाही विचार करत असाल. तुमच्या समस्येविषयी इतरांशी बोलल्याने खरोखर खूप मदत होऊ शकते. जर तुम्ही तुमच्या संपर्काची माहिती खाली नमूद केली, तर तुमची कथा ऐकण्यासाठी आणि तुम्हाला शक्त ती मदत करण्यासाठी कोणीतरी तुमच्याशी संपर्क करेल. कारण हा त्रास सहन करणारे तुम्ही एकटेच नाही.

छायाचित्र सौजन्याने Yogendra Singh

तुम्ही एकटेच प्रवास करण्याची गरज नाही. एखाद्या सल्लागाराशी बोला. हे गोपनीय आणि नेहमी मोफत आहे.

या समस्यांना सामोरे जाणे कठीण होऊ शकते. तुम्ही स्वतःला किंवा इतरांना इजा करण्याचा विचार करत असाल, तर कृपया हे वाचा!

कृपया खाली दिलेल्या फॉर्ममध्ये तुमची माहिती नमूद करा म्हणजे लवकरच आम्ही तुमच्याशी संपर्क करू.अन्यथा सूचित केले नसल्यास, सर्व रखाणे आवश्यक आहेत.

तुमचा लिंग::
वय श्रेणी (आवश्यक)::

तुमच्यासाठी एक योग्य सल्लागार नेमण्यासाठी आम्ही लिंग आणि वय विचारतो सेवेच्या अटी & गोपनीयता धोरण .