शरीर सुखासाठी माझा वापर करण्यात आला

टी.के. वर पहिल्यांदा बलात्कार करण्य़ात आला तेव्हा ती 15 वर्षांची होती. ती बाहेर एका स्वीमिंग पूलमध्ये पोहायला गेली होती. तिथे आणखी एक कुटुंब होते आणि म्हणून तिला सुरक्षित वाटले होते. पण जेव्हा ते कुटुंब त्यांच्या खोलीत परत गेले तेव्हा तिथे ती एकटीच होती आणि तो माणूस होता; त्या माणसाच्या मनात काय होते याची जराशीदेखील कल्पना तिला नव्हती

तिची कथा पाहा

तो तिच्या मागेमागे तिच्या खोलीपर्यंत गेला. “खात्री करण्यासाठी की तिच्यासाठी सर्वकाही सुरक्षित आहे.” आणि मग तो तिच्यामागे खोलीत गेला. त्यानंतर त्याने तिच्यासाठी बाथटबमध्ये पाणी भरले. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या बाथटबमधील थंड पाण्यात ती त्यांना सापडली.

ती 21 वर्षांची असताना परत एकदा तिच्यावर बलात्कार करण्यात आला. आपल्या बॉयफ्रेंडसोबत आणि इतर काही मित्रांसोबत आपण चित्रपट पाहायला जात आहोत असे तिला वाटले. तिला मुळीच कल्पना नव्हती की त्या रात्री ती स्वतःच एक “मनोरंजन” ठरणार होती.

जे काही घडले त्यात टी.के.चा काही दोष नव्हता, पण लाज आणि दोषभावनेवर मात करण्यासाठी तिला कितीतरी वर्षे लागली. तिला स्वतःला माफ करायला शिकावे लागले आणि तिच्यासोबत जे घडले त्या गोष्टीवरून तिचे मूल्य ठरत नाही हे समजणे तिला शक्य झाले. कालांतराने तिला समजले की प्रेम मिळवण्यास ती पात्र आहे. तिला हे समजले की तिच्यासोबत लोकांनी ज्या वाईट गोष्टी केल्या त्यामुळे तिचे मूल्य कलंकित झाले नाही.

तुम्हीही जर बलात्कार पीडित असाल, तर त्या जखमा खोलवर असतात, त्याच्या खुणा तीव्र असतात, आणि भावना जटिल असतात. पण, तुम्ही एकटेच नाही. जर तुम्ही तुमची माहिती खाली नमूद केली, तर आमच्यापैकी कोणीतरी लवकरच तुमच्याशी संपर्क करेल.

हे देखील पाहा: स्वातीची कथा: “गप्प राहून यातना सहन केली”.

गोपनीयतेच्या कारणांमुळे लेखकाची आद्याक्षरे वापरण्यात आली आहेत.
छायाचित्र सौजन्याने Juan Pablo Arenas

तुम्ही एकटेच प्रवास करण्याची गरज नाही. एखाद्या सल्लागाराशी बोला. हे गोपनीय आणि नेहमी मोफत आहे.

या समस्यांना सामोरे जाणे कठीण होऊ शकते. तुम्ही स्वतःला किंवा इतरांना इजा करण्याचा विचार करत असाल, तर कृपया हे वाचा!

कृपया खाली दिलेल्या फॉर्ममध्ये तुमची माहिती नमूद करा म्हणजे लवकरच आम्ही तुमच्याशी संपर्क करू.अन्यथा सूचित केले नसल्यास, सर्व रखाणे आवश्यक आहेत.

तुमचा लिंग::
वय श्रेणी (आवश्यक)::

तुमच्यासाठी एक योग्य सल्लागार नेमण्यासाठी आम्ही लिंग आणि वय विचारतो सेवेच्या अटी & गोपनीयता धोरण .