मला नाकारलं आणि पोर्नला स्वीकारलं
मागील एका दशकापेक्षा जास्त काळ मी एका अशा माणसासोबत विवाहित होते ज्याला पोर्नचं व्यसन जडलेलं होतं. आणि त्याविषयी मला काहीच माहीत नव्हतं. याचं कारण म्हणजे ते एक कॉम्प्युटर प्रोग्रामर
होते आणि म्हणून त्यांनी कधीही आपल्या कॉम्प्युटरवरील पोर्नचा सुगावादेखील लागू दिला नाही. आणि त्यांना पोर्नचं व्यसन आहे अशी शंका बाळगण्याचं माझ्याकडेही काही कारण नव्हतं.
शारीरिक संबंधांबद्दल आमच्यामध्ये नक्कीच काही समस्या आहे याची मला खात्री होती. कारण ते कितीतरी दिवसांपर्यंत माझ्याशी जवळीक साधण्याचा किवा शारीरिक संबंध स्थापित करण्याचा प्रयत्न करायचे नाही. मी याविषयी बोलले तर ते म्हणायचे की आता इच्छा नाही किंवा कोणत्या ना कोणत्या प्रकारे मलाच दोष द्यायचे.
कधीकधी ते विचित्रपणे वागायचे-काय बोललं जात आहे त्याकडे लक्ष न देणं, किंवा खूप वेळपासून एकटं राहायला मिळालं नसेल तर चीडचीड करणं, वगैरे. काही बाबतीत पाहिल्यास, ते माझ्या काही मित्रांसारखं
वागत होते ज्यांना दारूचं किंवा अंमली पदार्थांचं व्यसन जडलं होतं. यांनादेखील कशाचंतरी व्यसन लागलं असावं अशी मला शंका आली असली, तरी त्या गोष्टीचा मला काही पुरावा सापडला नव्हता. आणि त्या
वेळी मला माहीतही नव्हतं की लोकांना पोर्नंचंदेखील व्यसन असू शकतं.
विडंबना अशी की माझा आधीचा नवरा पोर्नोग्राफीच्या विरोधात असल्याचं नेहमीच बोलून दाखवायचा.
“तुम्ही कधी पोर्नोग्राफी पाहता का?” असं एका मित्रानं त्यांना विचारल्याचं मला आठवतं. त्या वेळी ते रागानं म्हणाले होते, “अशा घाणेरड्या गोष्टी पाहून मी माझ्या पत्नीचा आणि मुलींचा कधीच अनादर करणार
नाही.” आणि त्या वेळी मी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता.
म्हणून ते कामुक चित्रांचा वापर करत असल्याचं त्यांनी मला सांगितलं तेव्हा माझा विश्वासघात झाल्यासारखं मला वाटलं. अशा आभासी चित्रांचा वापर करून ते मला “धोका” देत आहेत इतकंच मला वाटलं नाही, तर ते खोटारडे आहेत, आणि एक चांगली व्यक्ती असल्याचं फक्त ढोंग करत आहेत असंही वाटलं. हे ऐकूनच घाबरायला होतं. ते असं दाखवायचे की ते एक प्रामाणिक, लैंगिक संबंधांच्या बाबतीत
विश्वासू पती आहेत. पण खरं पाहता, सत्य यापेक्षा कैकपटीनं वेगळं होतं.
आणि त्यांच्या या वाईट सवयीबद्दम मला अचानक एकदाच कळलं असं नाही. ते हळूहळू जाहीर होऊ लागलं. कधीकधी ते कबूल करायचे की ते फक्त स्त्रियांच्या अंतवेस्त्रांची जाहिरात पाहत आहेत, आणि मग, जेव्हा आमचं त्याविषयी बोलून व्हायचं त्यानंतर ते आणखी एखादी गोष्ट कबूल करायचे, जी आधीच्या गोष्टीपेक्षाही वाईट असायची. आणि हे असं वारंवार होऊ लागलं.
त्यांच्या अशा प्रकारच्या वागणुकीबद्दन मला कळलं तेव्हा मी अतिशय थक्क झाले आणि घाबरून गेले; यांपैकी अनेक गोष्टींबद्दल मला कितीतरी वर्षापर्यंत माहीतंच नव्हतं. शिवाय, मला जेव्हा कळलं की ते पोर्न
पाहतात, तेव्हा मला वाटलं की कदाचित माझ्यामध्येच काही दोष असेल. मी स्वतःशीच तर्क केला की माझ्यापासून ते तृप्त होत नसावेत. मी कदाचित त्यांना खूश करू शकत नसावी. मी कदाचित तितकी
सुंदर, कामुक, अधीन असणारी नसावी, माझ्यामध्ये स्त्रीत्वाची कमतरता असावी. आणि त्याच वेळी मला असंही वाटायचं की मी खूप जास्त मागणी करत असावी. मी खूप जास्त वास्तववादी, मानवतावादी
असावी, जिच्या भावना त्यांच्या भावनांपेक्षा अतिशय वेगळ्या असाव्यात. मी अतिशय गरजू, अतिसंवेदनशील असावी. माझ्यामध्येच दोष असावेत. मला खूपच लज्जास्पद, नाकारल्यासारखं, आणि एकाकी वाटायचं.
इतकंच नाही, तर माझी काहीच किंमत नाही असं मला वाटायचं. मला वाटायचं की मी त्यांच्यासाठी खास आहे, माझी जागा इतर कोणीच घेऊ शकत नाही, आणि मी त्यांना हवीहवीशी वाटते; पण ते तर आपली
लैंगिक इच्छा माझ्याऐवजी एका कॉम्प्युटर स्क्रीनद्वारे पूर्ण करत होते. मी एक व्यक्ती किवा मानव नाही, त्यामुळे एखादे चित्र किंवा विचार माझी जागा सहजपणे घेऊ शकते असं मला वाटायचं.
प्रामाणिकपणे सांगायचं झाल्यास, मी खूपच कुरूप-महाकुरूप आहे असा मला वाटायचं. सौंदर्याच्या अशा एका स्तराची माझ्याकडून अपेक्षा केली जात होती जी माझ्यासाठी अशक्य होती, त्यामुळे मी गप्प राहिले.
खूप लाज वाटत असल्यामुळे मी कोणाला सांगितलं नाही.
मला वाटायचं की मी त्यांच्यासाठी खास आहे, माझी जागा इतर कोणीच घेऊ शकत नाही, आणि मी त्यांना हवीहवीशी वाटते; पण ते तर आपली लैंगिक इच्छा माझ्याऐवजी एका कॉम्प्युटर स्क्रीनदवारे पूर्ण
करत होते.
लैंगिक संबंधांची मलाच खूप गरज आहे असं माझे माजी पती विचार करायचे हे मला कळून चुकलं होतं, पण ते असं का करायचे कारण खरंतर माझ्या वाजवी गरजा पूर्ण करण्यासही ते अमर्थ होते. मी
हवीहवीशी वाटणारी नाही असं नाही. तर, त्यांनी स्वतःला अशा प्रकारे प्रशिक्षित केलं होतं, की त्यांना फक्त कल्पनारम्य गोष्टीच आवडू लागल्या होत्या. आणि अशा काल्पनिक गोष्टींची तुलना कोणत्याही खऱ्या व्यक्तीशी होऊच शकत नाही. सी. एस. लुईसच्या म्हणण्याप्रमाणे, “हा जनानखाना नेहमी खुला, नेहमी अधीनस्थ असतो, त्यासाठी त्याग किंवा बदल करण्याची गरज नाही, आणि त्यात मानसशास्त्रीयद्ृष्ट्या कामुक आणि सोौंदर्यानं भरपूर अशा काल्पनिक स्त्रियांना ठेवू शकतो, ज्यांच्याशी
कोणतीही वास्तविक स्त्री स्पर्धी करू शकत नाही... त्या काल्पनिक सुंदरींच्या सान्निध्यात नेहमी त्याची
प्रशंसा होते, ते त्यांच्यावर प्रेम करणारे एकुलता एक प्रेमी आहेत; त्यांच्या निःस्वार्थतेच्या बदल्यात
कोणतीही मागणी केली जात नाही, त्यांच्या गर्विष्ठपणाला कधीही खंडित केलं जात नाही”
दुर्दैवाने, मला लाज वाटायला लावणाऱ्यांमध्ये माझा पती एकटाच नव्हता. काही लोक सुचवायचे की त्यांच्या पोर्नच्या व्यसनासाठी खरंतर मीच जबाबदार आहे, कारण मी लैंगिक संबंधांसाठी नकार देत असणार असा ते विचार करत होते. ह्या लोकांना हे कळत नव्हतं की माझ्यासोबत लैंगिक संबंध ठेवण्यात माझ्या पतीची मुळीच इच्छा नसायची. मला हेही सांगण्यात आलं की कदाचित मीच त्यांच्यावर मर्यादा घालत असणार, मी कदाचित उदासीन असणार, प्रेमळ नसणार, आणि त्यांना रिझवत नसणार, किंवा त्यांच्या अधीन नसणार. यामुळे पुन्हा एकदा मला वाटायचं की माझ्यामध्ये काहीही कमतरता नसूनही मी त्यांच्यासाठी पुरेशी नाही.
खरं पाहिल्यास माझ्यामध्ये काहीच कमतरता नव्हती. समस्या माझ्यामध्ये नाही तर त्यांच्यामध्ये होती. त्यांच्या आवडीनिवडींसाठी मी जबाबदार नव्हती. मी फारशी नाही किंवा फारच कमी पण नाही. मी जशी
असायला पाहिजे अगदी तशीच आहे, अगदी देवानं बनवली तशी, एक खरीखुरी स्त्री जिच्या इच्छा आणि गरजा आहेत.
जर तुमच्याही पतीला पोर्नोग्राफीचं व्यसन लागलं असेल, तर तुम्ही या प्रवासात एकटे नाही. या प्रवासात तुम्हाला साथ द्यायला आम्हाला नक्कीच आवडेल. तुम्ही आपली संपर्काची माहिती खाली नमूद करा, आणि आमच्यापैकी कोणीतरी लवकरच तुमच्याशी संपर्क करेल. आमची सल्ला देण्याची सेवा गोपनीय आणि अगदी मोफत आहे.
गोपनीयतेच्या कारणांमुळे लेखकाची आद्याक्षरे वापरण्यात आली आहे.
तुम्ही एकटेच प्रवास करण्याची गरज नाही. एखाद्या सल्लागाराशी बोला. हे गोपनीय आणि नेहमी मोफत आहे.
या समस्यांना सामोरे जाणे कठीण होऊ शकते. तुम्ही स्वतःला किंवा इतरांना इजा करण्याचा विचार करत असाल, तर कृपया हे वाचा!
कृपया खाली दिलेल्या फॉर्ममध्ये तुमची माहिती नमूद करा म्हणजे लवकरच आम्ही तुमच्याशी संपर्क करू.अन्यथा सूचित केले नसल्यास, सर्व रखाणे आवश्यक आहेत.