नफा विरुद्ध नीतिमूल्ये

पहिल्यांदा उद्योजक बनलेल्या पुष्कळ लोकांप्रमाणे, एक मोठी झेप घेण्याचा उत्साह मी टाळू नाही शकलो. गोष्टींची विपुलता आणि करोडो रुपये कमावण्याचा विचार यांमुळे माझी भीती सहज नाहीशी झाली.

स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या १५ वर्षांआधीपर्यंत मी दुसऱ्यांसाठी काम करत होतो. दूरसंचार उद्योगात उदयास आलेल्या काही नामांकित कंपन्यांमध्ये परिचालनाचे काम करण्याचा मला चांगला अनुभव होता. पण, हा इतका मोठा ठेवा सोडून “काहीतरी मोठं” करण्याचा विचार नेहमी माझ्या डोक्यात येत राहायचा.

एक “छोटीशी कल्पना” कशा प्रकारे एक मोठं रूप धारण करू शकते याची जिवंत उदाहरणं म्हणजे ॲप्पल, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट, आणि ऑरॅकल यांसारख्या कंपन्या. याच दरम्यान, परदेशात काम करत असताना, माझी ओळख एक जणाशी झाली जो नंतर माझा सहकर्मचारी बनला. त्याच्याकडे एक कल्पना होती आणि ती कल्पना मला खूपच आवडली; एक नवीन कंपनी सुरू करण्यासाठी एक गुंतवणूकदार पैसा लावण्यासाठीही तयार होता. कंपनीत काम करण्यासाठी मला पगार मिळणार होता, आणि कंपनीला यशस्वी करण्यासाठी मला खूपखूप मेहनत करावी लागणार होती. हा सौदा कोणत्याही दृष्टिकोनातून अतिशय चांगला सौदा होता.

करोडो रुपये कमावण्याच्या विचारामुळे माझी भीती सहज नाहीशी झाली.

या कामाच्या परिचालनासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या सर्व तज्ज्ञांचे संपर्क मी जमवले होते. एक मोठी झेप घेण्यासाठी मी एक मोठी कंपनी आणि चांगल्या पगाराची नोकरी सोडली. परिचालनाची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर होती; यात नवीन खात्यांची देखभाल आणि उत्पन्न “वाढवणं” या गोष्टी सामील होत्या. आम्ही कंपनी सुरू केली आणि काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली.

आम्हाला आमच्या कंपनीचा पहिला ग्राहक मिळाला आणि उपक्रमाला सुरुवात केली. त्यांनंतर आणखी काही ग्राहक आम्हाला मिळाले. काही महिन्यांतच, दर महिन्याला होणारी उलाढाल बऱ्यापैकी वाढली, कारण आम्ही पुरवत असलेली सेवा खास होती आणि त्यामुळे लवकरच आमची लोकप्रियता वाढली. आमच्या सेवांकडे ग्राहकांचे आणि आमच्या प्रतिस्पर्ध्यांचेही लक्ष लागलेले असायचे.

पण, ग्राहकांची संख्या अंदाजाप्रमाणे वाढत नव्हती, आणि त्यामुळे पैशांची कमतरता भासू झाली. मी एका जबाबदारीच्या पदावर असल्यामुळे, ग्राहकांकडून होताहोईल तितके पैसे काढण्याची जबाबदारी माझ्याच खांद्यावर होती. माझ्या डोक्यात अपयशी होण्याची शक्यता, व्यवसायाची वाढ, प्रसिद्धी, आणि श्रीमंती हेच विचार रात्रंदिवस सुरू असायचे. “सर्वच कंपन्या” आपला नफा वाढवण्यासाठी अनैतिक मार्गांचा अवलंब करतात असं सांगण्यात येत असल्यामुळे, आमच्या सेवांचा वापर करणाऱ्या आणि आमच्यावर भरवसा ठेवलेल्या ग्राहकांकडून जास्तीचे पैसे कसे उकडता येतील अशा “योजना” माझ्या डोक्यात येऊ लागल्या.

अशा योजनेमुळे आमची मिळकत बऱ्यापैकी वाढली. मला आणि माझ्या संघाच्या पगारात वाढ करण्यात आली. पूर्वी ज्या वस्तू मी विकत घेऊ शकत नव्हतो, त्या आता मी सहज विकत घेऊ शकत होतो म्हणून मला खूप आनंद झाला. पण, कुठंतरी काहीतरी चुकत आहे असं मला वाटत होतं. जेव्हाजेव्हा भ्रष्टाचाराविरुद्ध कोणीतरी बोलायचं, तेव्हातेव्हा कोणीतर मला आतून चिमटा घेत आहे असं वाटायचं. आता माझा आनंद हिरावून जात होता. आता मी आपलं डोकं वर करून चालू शकत नव्हतो. या कामात आमच्या सगळ्यांचा हातभार असला, आणि सर्वांनाच फायदा होत असला तरीही या पांढरपेशा गुन्ह्याच्या ओझ्यानं आणि लाजेमुळं मी दबून जात आहे असं मला वाटत होतं.

परिस्थितीत मोठा बदल त्या वेळी झाला जेव्हा मला आमच्या एका ग्राहकाला भेटण्याची संधी मिळाली. मी याच कंपनीत काम करतो हे त्या व्यक्तीला माहीत नव्हतं. त्या व्यक्तीनं म्हटलं तिला ज्या कंपनीची सेवा वापरायला इतकी आवडते, पण ती कंपनी चुकीच्या पद्धतीनं आमच्या मेहनतीचं पैसा उकडत आहे, जो आम्ही अशा प्रकारे सहजपणे खर्च करू शकत नाही. याविषयी मी जेव्हा कंपनीच्या प्रमुख लोकांना सांगितलं, तेव्हा ते मला म्हणाले की अशा नैतिक गोष्टींकडे मी दुर्लक्ष करावं; आणि आतापर्यंत जसं चालू होतं पुढेही तसंच चालू ठेवण्यासाठी त्यांनी मला अनेक कारणं सांगितली.

मला एक कठीण निर्णय घ्यायचा होता—तो म्हणजे जे चाललं आहे ते स्वीकार करायचं किंवा कंपनी सोडून द्यायची

मला तोपर्यंत याची जाणीव झाली होती की मला एक कठीण निर्णय घ्यायचा आहे—तो निर्णय म्हणजे ज्या स्टार्ट-अप कंपनीला वाढवण्यास मी मदत केली त्या कंपनीला नेहमीसाठी सोडायचं की, जे चाललं आहे ते स्वीकार करायचं आणि जी गोष्ट मला आतून खात आहे, ती पुढेही करत राहायची. याविषयी मी माझ्या कुटुंबासोबत चर्चा केली, आणि मी एका निर्णयावर पोहचलो. मी निर्णय घेतला की चुकीच्या मार्गानं कमावलेला पैसा मी थेट ग्राहकांना परत करेन आणि कंपनीचा राजीनामा देईन.

इतकी वर्ष ज्या कंपनीसोबत काम केलं होतं त्या कंपनीला सोडणं तसं खूप कठीण होतं. कंपनीच्या वाढीसाठी मी खूप मेहनत घेतली होती आणि तसंही कंपनीतील सर्वच गोष्टी वाईट नव्हत्या. पण, मला जाणीव झाली की जर मला माझ्या कुटुंबाच्या नजरेत, मी ज्या उद्योगात काम करतो त्या उद्योगाच्या नजरेत, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःच्या नजरेत डोकं वर करून वावरायचं असेल, तर मी कंपनीसोबत पूर्णपणे संबंध तोडणं गरजेचं आहे.

आपल्यापैकी बऱ्याच जणांना आपल्या व्यावसायिक जीवनात अशाच दुविधांचा सामना करावा लागत असतो. या गोष्टींमुळे आपल्याला सत्य पाहण्यास मदत मिळते—किंवा आतून हळूच एक आवाज आपल्याला योग्य ते करण्याची आठवण करून देतो—आणि हे अपघातानं किंवा इतर मार्गानं होऊ शकतं. मी अशा गोष्टींकडे लक्ष द्यायला शिकलो, आणि मला आनंद होतो की मी हे करू शकलो.

तुम्हीही जर अशाच प्रकारच्या द्विधा मनःस्थितीत असाल, तर तुम्ही एकटे नाही. तुमच्याशी बोलायला आम्हाला आवडेल. खाली दिलेल्या फॉर्मचा वापर करून तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता.

गोपनीयतेच्या कारणांमुळे लेखकाचे संक्षिप्त नाव वापरण्यात आले आहे.
छायाचित्र सौजन्याने Chinmay Singh

तुम्ही एकटेच प्रवास करण्याची गरज नाही. एखाद्या सल्लागाराशी बोला. हे गोपनीय आणि नेहमी मोफत आहे.

या समस्यांना सामोरे जाणे कठीण होऊ शकते. तुम्ही स्वतःला किंवा इतरांना इजा करण्याचा विचार करत असाल, तर कृपया हे वाचा!

कृपया खाली दिलेल्या फॉर्ममध्ये तुमची माहिती नमूद करा म्हणजे लवकरच आम्ही तुमच्याशी संपर्क करू.अन्यथा सूचित केले नसल्यास, सर्व रखाणे आवश्यक आहेत.

तुमचा लिंग::
वय श्रेणी (आवश्यक)::

तुमच्यासाठी एक योग्य सल्लागार नेमण्यासाठी आम्ही लिंग आणि वय विचारतो सेवेच्या अटी & गोपनीयता धोरण .